कुडाळात गणपती विसर्जन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

फटाक्‍यांच्या आतषबाजी करत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या नामघोषात श्री भक्तिमय वातावरणात निरोप देत भंगसाळ येथील नदीपात्रात श्रींचे विसर्जन करण्यात आले.

कुडाळ - शहरात 21 व्या दिवसांच्या गणरायाला गणपती बाप्पा मोरयाच्या नामघोषात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.

ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत बाप्पाला निरोप देताना शहरात पोलिस ठाण्याच्या सार्वजनिक गणपतीसह वाघ सावंतटेंब येथील सावंत घराण्याचा, तसेच एसटी स्टॅंड येथील शारबिद्रे कुटुंबीयांच्या 21 व्या दिवसांच्या श्री गणेशासह इतर घराण्यांतील गणपतींची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. गणेशभक्तांनी डोक्‍यावर भगवे फेटे घातले होते. फटाक्‍यांच्या आतषबाजी करत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या नामघोषात श्री भक्तिमय वातावरणात निरोप देत भंगसाळ येथील नदीपात्रात श्रींचे विसर्जन करण्यात आले.

Web Title: ganpati visarjan in kudal