प्रक्रिया केलेल्या आंब्यावरील जीएसटी कमी होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

गणपतीपुळे - फळांवर प्रक्रिया करून बनवलेल्या उत्पादनांवरील १२ टक्के जीएसटी कमी होण्याचे संकेत मिळाले आहेत. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटी कमी करण्याबाबतचे निर्देश दिल्‍याची माहिती केळकर कॅनिंगचे विनायक केळकर यांनी दिली.

फळांवर प्रक्रिया करून बनवलेल्या उत्पादनावर १ जुलैपासून १२ टक्के जीएसटी लागला आहे. रत्नागिरी तालुक्‍यातील मालगुंड येथील केळकर कॅनिंग उद्योगाचे संचालक विनायक यांनी वित्तमंत्र्यांशी चर्चा करून निवेदन दिले होते. कोकणात आंब्यावर प्रक्रिया करून व्हॅल्यू ॲडिशन करून चांगला फायदा होत आहे. आंबा, कोकमवर प्रक्रिया उद्योगामुळे शेतकरी व उद्योजकांहाती पैसे येण्यास उपयुक्त ठरतात व  रोजगारही वाढीस लागला आहे. या उत्पादनांना विक्री करातून वगळण्यात आले होते. व्हॅट ६ टक्‍क्‍यांपर्यंत आकारला जात होता; मात्र जीएसटी १२ टक्के सुरू झाल्याने या उत्पादनाची किंमत वाढेल. त्यामुळे आंबा व कोकम यापासून बनवलेल्या वस्तूंवर जीएसटी कमी करावा, अशी मागणी केली होती.
काजू प्रक्रिया उद्योगाला १२ टक्‍क्‍यांऐवजी ५ टक्के जीएसटी आकारण्यास मंजुरी मिळाली आहे. त्याप्रमाणे आंबा प्रक्रिया उत्पादनांवर ३ टक्के जीएसटी आकारावा, अशी मागणी केळकर यांनी केली आहे. अर्थमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे जीएसटी निश्‍चित कमी होईल, असा विश्‍वास त्यांनी 
व्यक्त केला.

Web Title: ganpatipule konkan news GST will be reduced on processed mangoes