लांजा तालुक्यात गवारेड्यांचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

लांजा -  तालुक्यातील वेरळ-कणगवली गावांमध्ये गवारेडयांनी धुमाकुळ घातला. झुंडीने फिरणार्‍या या गव्यांनी भातशेतीचे नुकसान केले आहे. काजू, आंबा बागांचेही नुकसान करण्यास सुरवात केली आहे. ​

लांजा -  तालुक्यातील वेरळ-कणगवली गावांमध्ये गवारेडयांनी धुमाकुळ घातला. झुंडीने फिरणार्‍या या गव्यांनी भातशेतीचे नुकसान केले आहे. काजू, आंबा बागांचेही नुकसान करण्यास सुरवात केली आहे. 

पावसामुळे बहरलेले डोंगर आणि वाढलेली झाडेझुडपे यामुळे गव्यांच्या कळपाने वेरळ-कणगवली गावांकडे आपला मोर्चा वळविला आहे. कळपाने फिरणार्‍या गव्यांचा वेरळ भागात मोठ्या प्रमाणात वावर सुरू झाला आहे. या गव्यांनी आपले लक्ष भातशेतीकडे वळविले आहे. वेरळ येथील अनेक शेतकर्‍यांनी आंबा व काजू पिकांची लागवड केली आहे. त्यालाही गव्यांनी लक्ष केले असून आंबा व काजू रोपांची नासधूस करण्याचा सपाटा लावला आहे. गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. रात्री भातशेती व लागवड केलेल्या बागांचे नुकसान करण्याचा या गव्यांनी सपाटा लावला आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे. 

Web Title: Gava damage crops in Lanja Taluka

टॅग्स