मालवणातील नांदोस परिसरात गव्यांचा मुक्त संचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मार्च 2019

मालवण - तालुक्‍यातील नांदोस लिंग मंदिर ते भिलारीवाडी परिसरात आज गवारेड्याचा मुक्तपणे संचार दिसून आला. वस्तीलगत गवारेड्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष पुरवीत तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

तालुक्‍याच्या ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यात गवारेड्यांचा संचार वस्तीलगतच्या परिसरात वाढला असल्याचे दिसून आहे. काही दिवसांपूर्वी नांदोस येथे गवारेड्याने केलेल्या हल्ल्यात श्री. कोरगावकर या शेतकऱ्याला आपला प्राण गमवावा लागला.

गवारेड्यांच्या मुक्तसंचाराने शेतीच्या कामास किंवा बागायतींमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून त्यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

आज सकाळी नांदोस लिंग मंदिर ते भिलारीवाडी येथे तसेच पेंडूर मोगरणे या भागात रस्त्यावर गवारेडे दिसून आले. भरवस्ती लगतच्या मळ्यांमध्ये हे गवारेडे दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये तसेच स्थानिक ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वन विभागाने याची तत्काळ दखल घेत आवश्‍यक त्या उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gava seen in Nandos in Malvan Taluka