मुंबईच्या राजाचे ९० व्या वर्षात पदार्पण

मुंबईच्या राजाचे ९० व्या वर्षात पदार्पण

कुडाळ - स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईस्थित कोकणातील चाकरमान्यांनी मोठ्या गणेशोत्सवाचा पाया रचला आणि लालबाग परळ गिरगाव उत्सवाचे केंद्रबिंदू बनले. या चाकरमान्यांनी मुहूर्तमेढ रोवलेला लालबाग गल्लीतील मुंबईचा राजा यावर्षी ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

मराठी माणसाच्या एकोप्यासाठी या सार्वजनिक गणेश मंडळाने फार मोलाची मदत केली. त्यामुळे मुंबईत मराठी माणूस टिकून राहिला आहे, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग शिवाजी पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील पवार यांनी 
व्यक्त केले. 

या गणेशोत्सवाबाबत ‘सकाळ’शी बोलताना श्री. पवार म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर तरुण वर्गात नवचैतन्य निर्माण झाले. कोकणातील जास्तीत जास्त लोक मुंबईला कामानिमित्त येऊ लागले. तेव्हा प्रवास हा समुद्रमार्गे बोटीने असायचा. गणेशोत्सव सण पावसाळ्यात येत असल्यामुळे कोकणात जाणे अवघड होते. अशा परिस्थितीत गणपती पूजन करण्यासाठी कोकणातील तरुण कार्यकर्ते एकत्र आले. मुंबईत गल्लीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे उभे राहू लागले.

स्वातंत्र्यानंतर १९४७ ला कोकणी तरुणाच्या जिद्दीवर गणेश मंडळ उभे राहू लागले. लालबागचा गणेश गल्लीतील सार्वजनिक गणपती, त्यांचे पूर्वीचे नाव कोंबडे गल्ली होते. त्याच्याच बाजूला लालबागचा राजा या गणपतीला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे. तशीच प्रसिद्धी गणेश गल्लीतील गणपती अर्थात मुंबईचा राजा म्हणून त्यांची ओळख आहे. हा मुंबईचा राजा यंदा ९० व्या वर्षात दिमाखात पदार्पण करीत आहे.’’

श्री. पवार म्हणाले, ‘‘गणेशोत्सव मंडळ उभे राहण्याचे श्रेय कोकणातील चाकरमान्यांनाच दिले पाहिजे. त्यावेळी लालबाग गोदरेज कंपनीत शांताराम पवार नावाची व्यक्ती कामाला होती. त्यांनी हजारो लोकांना त्यावेळी गोदरेजमध्ये कामाला लावले. त्यावेळी त्यांनी शंभर रुपये देणगी दिली. या देणगीची पावती ७० वर्षे झाली तरी आजही श्री. पवार यांच्याकडे उपलब्ध आहे. चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांचे सुद्धा या गणेशोत्सवाबाबत फार मोठे सहकार्य होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com