esakal | गोव्यातील चोरवाटांवर पोलिसांची करडी नजर; ई-पास सक्तीचाच

बोलून बातमी शोधा

गोव्यातील चोरवाटांवर पोलिसांची करडी नजर; ई-पास सक्तीचाच
गोव्यातील चोरवाटांवर पोलिसांची करडी नजर; ई-पास सक्तीचाच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) : गोव्यातून महाराष्ट्रात येताना उद्यापासून (ता.25) ई-पास अत्यावश्‍यक करण्यात आला असून ज्यांच्याकडे प्रवासाचा परवाना नसेल त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सटमटवाडी तपासणी नाक्‍यावर ई पासची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. चोरवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी उद्यापासून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला. जिल्ह्यातून गोव्यात नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्यांनाही हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यासाठी नोकरदारांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. एकदा चाचणी केल्यानंतर त्याची मुदत 15 दिवस असेल.

शासनाच्या या निर्णयामुळे रोज गोव्यात नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्यांना ई-पास काढणे आवश्‍यक आहे. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर सटमटवाडी येथे थर्मल तपासणी नाक्‍यावर पोलिसांकडून गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनचालकांकडे ई-पास तपासण्यात येणार आहे. ई-पास नसल्यास त्या वाहनांना जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश नाकारण्यात येणार आहे. गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर तसेच जिल्ह्यात येणाऱ्या अन्य रस्त्यांवर उद्यापासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

Edited By- Archana Banage