जखमी भेकरीला घोले बंधूकडून जीवदान

सुनील पाटकर
सोमवार, 16 जुलै 2018

केंबूर्ली गावाला लागुनच असलेल्या डोंगरात जखमी अवस्थेत सापडलेल्या भेकरीला केंबूर्ली येथील घोले बंधूमुळे जीवदान मिळाले आहे. मुंबई गोवा महामार्गावर रस्ता ओलांडत असताना ही भेकर जखमी झाली असावी असा अंदाज आहे.

महाड- केंबूर्ली गावाला लागुनच असलेल्या डोंगरात जखमी अवस्थेत सापडलेल्या भेकरीला केंबूर्ली येथील घोले बंधूमुळे जीवदान मिळाले आहे. मुंबई गोवा महामार्गावर रस्ता ओलांडत असताना ही भेकर जखमी झाली असावी असा अंदाज आहे.

मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या केंबूर्ली गावाला लागुनच डोंगर आहे. याठिकाणी आज सकाळी भटक्या कुत्र्यांचा आवाज वाढला होता. यामुळे त्याठिकाणी गेलेल्या साजन घोले याला एक भेकर जखमी अवस्थेत आढळून आली. त्याने आपले चुलत भाऊ मोईन आणि मुबीन यांना कळवले. मोईन आणि मुबीन यांनी धावत जावून प्रथम या भेकरीला ताब्यात घेतले आणि घरी आणून पाणी पाजले.

महाड वन विभागाला कळवले त्यांनी कळवले असता महाड वन विभागाचे वनपाल रमेश देवरे, प्रशांत गायकर आणि वनरक्षक डी.पी.पवार यांनी केंबूर्ली येथे जाऊन जखमी भेकरीला ताब्यात घेवून महाड वन विभागाच्या कार्यलयात उपचारासाठी आणले. येथे तिच्यावर उपचार करण्यात आले.

Web Title: ghole bandhu mahad kokan news