संजाव सणादरम्यान मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

सावंतवाडी : ख्रिस्ती धर्मियांकडून खेळला जाणारा संजाव या सणाचा आनंद लुटताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे डोहात बुडून येथील मिलाग्रिस हायस्कूलच्या विद्यार्थिनीच्या बुडून मृत्यू झाला.

सावंतवाडी : ख्रिस्ती धर्मियांकडून खेळला जाणारा संजाव या सणाचा आनंद लुटताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे डोहात बुडून येथील मिलाग्रिस हायस्कूलच्या विद्यार्थिनीच्या बुडून मृत्यू झाला.

हा प्रकार काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिरोडा न्हैचीआड परिसरात घडला प्रिन्सिका मेंडोझा (वय 14) असे त्या मुलीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रिन्सिका हीचे घर दाभोली वेंगुर्ला येथे आहे. ती सावंतवाडी येथील मिलाग्रिस हायस्कूलमध्ये आठवीमध्ये शिकत होती. काल ख्रिस्ती धर्माचा संजाव हा सण असल्यामुळे शिरोडा न्हैचीआड येथील आपल्या मामाकडे ती गेली होती. त्या ठिकाणी सायंकाळी सर्वांसोबत खेळ खेळत असताना बाजूच्या डोहात उड्या मारण्यासाठी गेले. मात्र त्या ठिकाणी प्रिन्सिका हिला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ती डोहात बुडाली.

काही वेळाने त्यांच्यासोबत असणाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला मात्र तत्पूर्वी तिचे निधन झाले. त्यांची काही अभ्यासात हुशार होती मनमिळावू होती लहानपणीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. याबाबतची माहिती मिळताच मिलाग्रिस हायस्कूल प्रशासनाच्यावतीने शाळा सोडून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: a girl dies due to fallen in water while sanjav