एकतर्फी प्रेम करणाऱ्याने जीव देणाऱ्या "ती'ला वाचविले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

रत्नागिरी - मांडवीत अल्पवयीन मुलीने समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तिला वाचवले. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रेयसी बुडत होती त्या वेळी प्रियकर किनाऱ्यावर बसून होता.

संगमेश्‍वर तालुक्‍यात राहणारे हे तिघे आज मांडवी समुद्रकिनारी आले होते. मात्र यातील अल्पवयीन मुलीने सर्वांसमोर समुद्रात उडी मारली. मात्र नंतर वाचविण्यासाठी मुलीने आकांडतांडव सुरू केले. तेव्हा त्यातील तरुणाने पाण्यात उडी मारून मुलीला सुखरूप बाहेर काढले. उपस्थितांनीही त्याला सहकार्य केले; परंतु या वेळी त्या मुलीचा कथित प्रियकर बघ्यांमध्ये सामील होता.

शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा प्रेमाचा त्रिकोण असल्याचे उघड झाले. बघ्याची भूमिका घेणाऱ्यामधील तो तरुण तिचा प्रियकर असल्याचे, तर वाचविणारा तरुण एकतर्फी प्रेम करणारा होता, असे चौकशीत पुढे आले. तिघे समुद्रकिनारी कशासाठी आले, त्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, या तरुणांच्या स्मार्ट फोनमध्ये काय आहे, ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे का, आदी मुद्द्यांची चौकशी उशिरापर्यंत शहर पोलिस करीत होते.

एखाद्या चित्रपटाला साजेशी या प्रेमकथेतील हे त्रिकूट सध्या शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. संबंधित मुलगी, मुलांच्या आई-वडिलांचे जाबजबाब नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: girl life saving by lover

टॅग्स