गृहपाठ करण्यास सांगितल्याने आठवीतील मुलीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - मोबाईलवर गेम काय खेळतेस बेडरूमध्ये जाऊन होमवर्क कर, असे वडिलांनी सुनावल्याच्या रागातून आठवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री शहराजवळील उद्यमनगर येथे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुहाना राहिल मिरकर (वय १४, रा. तारामती संकुल, उद्यमनगर, रत्नागिरी) असे या शाळकरी मुलीचे नाव आहे. 

सुहाना इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. काल शाळा सुटल्यानंतर ती घरी आली. काही काळ ती मोबाईलवर गेम खेळत होती. त्यावरून वडील राहिल अब्दुल सत्तार मिरकर (वय ४०) यांनी तिला हटकले. मोबाईलवर गेम काय खेळतेस, बेडरूमध्ये जाऊन होमवर्क कर, असे खडसावले. सुहाना रागाने मोबाईल ठेवून बेडरूममध्ये गेली. बराच वेळ बाहेर आली नाही. म्हणून जेवण्यासाठी तिला बोलावण्यात आले. परंतु खोलीतून काहीच प्रतिसाद आला नाही.

Web Title: Girl Suicide