ग्रामीण भागातील मुलांना चालना द्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

रत्नागिरी - "ग्रामीण भागातील मुले कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. ही पिढी पुढचा विचार करणारी आहे. विज्ञान प्रदर्शनासारख्या माध्यमातून त्यांच्या ज्ञानाला चालना द्या. त्यांचे चांगले प्रकल्प राष्ट्रीयस्तरापर्यंत पोचवावेत,' असे आवाहन आमदार उदय सामंत यांनी आज केले.

रत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन येथील नाणीज माध्यमिक विद्यामंदिरमध्ये सामंत यांच्या हस्ते झाले. रोबोटच्या साह्याने पाहुण्यांना प्रज्वलित केलेली मेणबत्ती देण्यात आली. तो चर्चेचा विषय होता. प्रदर्शन 20 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

सामंत म्हणाले, ""अशा विज्ञान प्रदर्शनातून अनेक अब्दुल कलाम निर्माण व्हावेत. जीवनात चांगले शिक्षक लाभणे भाग्याचे असते. शिक्षणात अधुनिक पद्धतीने कार्य करणाऱ्या राज्यांचे अनुकरण करावे. शिक्षकांचा मुलांनी आदर्श घ्यावा. या क्षेत्रात राजकारण आणू नये.''

या वेळी रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती महेश म्हाप, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय सोपनूर, विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, पं. स. सदस्या दाक्षायणी शिवगण, नाणीजचे सरपंच शर्मिला गावडे, संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम शिवगण, उपाध्यक्ष अनंत बसवनकर, खजिनदार दत्ताराम खावडकर, जगद्‌गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानचे कार्यकारी अधिकारी विनोद भागवत, संस्थानचे जनसंपर्क अधिकारी राजन बोडेकर, नाणीज हायस्कूलचे संस्थापक रामकृष्ण कात्रे, माजी मुख्याध्यापिका सौ. शालिनी कात्रे, मुख्याध्यापक शिवाजी तोंदले आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिकमधील एकूण 25 शाळा सहभागी झाल्या होत्या. सर्व शाळांनी प्रयोगांची उत्कृष्ट मांडणी व सादरीकरण केले होते.

दोन्ही दिवशी मुलांना अल्पोपहार जगद्‌गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आला. आज दिवसभरात विज्ञान दिंडीचे उद्‌घाटन, निबंध स्पर्धा, नाट्य स्पर्धा व प्रश्‍नमंजुषा इत्यादी कार्यक्रम झाले.

Web Title: Give a boost to children in rural areas