esakal | राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उपळकरांना संधी द्या 
sakal

बोलून बातमी शोधा

Give Opportunity To Pandurang Upalkar As  Member Appointed By Governor

गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसैनिकांकडून मागणी असूनही संघटनेकडून राजापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेना नेतृत्वाने उमेदवार म्हणून संधी दिलेली नाही.

राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उपळकरांना संधी द्या 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी) - शिवसेनेशी एकनिष्ठ राहून कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संघटना वाढविण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे माजी जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर यांचे विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोकणातून नाव चर्चेत आहे.

गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसैनिकांकडून मागणी असूनही संघटनेकडून राजापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेना नेतृत्वाने उमेदवार म्हणून संधी दिलेली नाही. संघटनेशी एकनिष्ठ असलेल्या उपळकर यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी मिळावी, अशी मागणी कुणबी समाजासह स्थानिक शिवसैनिकांकडून केली जात आहे. 

1985 च्या शिवसेनेच्या महाड अधिवेशनानंतर "चला आता महाराष्ट्रात' हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश शिरसंवाद्य मानून कोकणात संघटना वाढविण्यासाठी उपळकर यांनी विशेष योगदान दिले आहे. अनेक राजकीय घडामोडींमध्ये संघटनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या रूपाने सेना नेतृत्व एकनिष्ठतेला न्याय देणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना संघटनात्मक रुजविण्यामध्ये उपळकर यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सेना नेतृत्वाने त्यांना शिवसेना राजापूर तालुका प्रमुख (मुंबई), तालुका संपर्कप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, 1996 लोकसभा कोकण विभाग समन्वय समिती प्रमुख आदी महत्वाच्यापदांची जबाबदारीही दिली आहे.

संघटनेशी एकनिष्ठ राहत त्यांनी या पदांना योग्यप्रकारे न्याय दिला आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये राजापूर मतदार संघातून उपळकर यांचे सेनेकडून उमेदवार म्हणून नाव चर्चेत होते. स्थानिकांकडून तशी मागणीही केली गेली होती. मात्र, प्रत्येकवेळी त्यांच्याऐवजी इतरांना सेनेकडून संधी देण्यात आली. मात्र तरीही नाराज न होता संघटनेचे आदेश पाळून त्यांनी सेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्य पदांच्या नियुक्तांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेतून सत्ताधारी शिवसेनेकडृून कोणाला संधी देणार या दृष्टीनेही खलबते सुरू झाली आहेत. त्यामध्ये कोकणातून उपळकर यांचे नाव चर्चेत आहे.