रत्नागिरीत आढळला दुर्मिळ झीलन साप

अमोल कलये
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - येथील पाटीलवाडी परिसरात झीलन हा दुर्मिळ साप आढळून आला आहे. प्रविण कदम या सर्पमित्राने हा साप पकडून याला जीवदान दिले. हा साप पकडून जंगलात सोडण्यात आला.

रत्नागिरी - येथील पाटीलवाडी परिसरात झीलन हा दुर्मिळ साप आढळून आला आहे. प्रविण कदम या सर्पमित्राने हा साप पकडून याला जीवदान दिले. हा साप पकडून जंगलात सोडण्यात आला.

सापाबद्दल माहिती देताना प्रविण कदम म्हणाले की, हा साप मुख्यतः खाडी पट्ट्यात आढळतो. भारतातील सर्व किनारपट्टी भागात तसेच अंदमान बेटावर याचे वास्तव्य आहे. पण सध्या या सापाची जात दुर्मिळ होऊ लागली आहे. 

झीलन याला इंग्रजीमध्ये ग्लाॅसी मार्श स्नेक असे म्हणतात. दलदलीच्या भागात आढळणारा हा साप नीमविषारी आहे पण त्याच्या दंशाने मनुष्य मरत नाही. साधारण ३० ते ५२ सेंटीमीटर लांब हा साप असतो.  

-   प्रविण कदम, सर्प मित्र 

Web Title: Glossy Marsh Snake found in Ratnagiri

टॅग्स