गतवर्षीपेक्षा लांज्यात यंदा चांगला पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

लांजा - यावर्षी जून महिन्यापासूनच दमदार पाऊस तालुक्‍यात पडला. १ जून ते २ जुलैपर्यंत पावसाची सरासरी ही गतवर्षीपेक्षा ५२१ मि.मि.ने अधिक ठरल्याची नोंद झाली आहे. यावर्षी सुरवातीपासूनच पडणाऱ्या पावसाने तालुकावासीयांबरोबरच शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला आहे. गतवर्षी १ जून ते २ जुलै या महिनाभराच्या कालावधीमध्ये तालुक्‍यात ८६३.७० मि.मि. पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यावर्षी १ जून ते २ जुलै या कालावधीमध्ये १३८५.२० मि.मि. इतकी नोंद झाली आहे.

Web Title: Good rains this year in lanja