'जागृती फेस्ट'मध्ये चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

वेंगुर्ले : जागृती मंडळ व युवाशक्ती प्रतिष्ठान यांनी आयोजित जागृती फेस्टीव्हलमध्ये आज झालेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाच गटातून 310 स्पर्धक सहभागी झाले होते. पायल नेरुरकर, हर्ष कुडाळकर, मानसी पालव, श्रेयस गवंडे, राहुल पालकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.

वेंगुर्ले : जागृती मंडळ व युवाशक्ती प्रतिष्ठान यांनी आयोजित जागृती फेस्टीव्हलमध्ये आज झालेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाच गटातून 310 स्पर्धक सहभागी झाले होते. पायल नेरुरकर, हर्ष कुडाळकर, मानसी पालव, श्रेयस गवंडे, राहुल पालकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे संचालक विलास गावडे यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पार पडली. स्पर्धेतील गटवार विजेते पुढीलप्रमाणे - बालवाडी (विषय - फुल) पायल नेरुरकर (एम. आर. देसाई स्कूल), सुवर्णा कांबळी (शिवाजी प्रागतिक), चिन्मय कुडपकर (एम. आर. देसाई स्कूल), मानसी वराडकर (भिवजीवाडी अंगणवाडी), चिन्मय मराठे (भटवाडी क्रमांक एक), पहिली ते दुसरी (पक्षी) - हर्ष कुडाळकर (आडारी शाळा), पृथ्वीराज देसाई (वेंगुर्ले क्रमांक दोन), स्वराज मसुरकर (पडतेवाडी-कुडाळ), रुशिका नेरुरकर (एम. आर. देसाई स्कूल), मंजिरी गौरड (मदर तेरेसा), तिसरी ते चौथी (निसर्ग) - मानसी पालव (वडखोल शाळा), विष्णू आरोलकर (दाभोली क्रमांक एक), समृद्धी पालव (वडखोल शाळा), स्वर्णिम देऊलकर, अनिस गावडे (अणसूर शाळा), पाचवी ते सातवी (पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिम) - श्रेयस गवंडे (परबवाडा क्रमांक एक), प्रणव मालवणकर (वेंगुर्ले हायस्कूल), अंकुश मोर्ये (परबवाडा क्रमांक एक), मनिष गावडे (जैतिर विद्यालय तुळस), तुळशीदास गिरप (वेंगुर्ले क्रमांक दोन), आठवी ते दहावी (स्वच्छता मोहिम) - राहूल पालकर (कुडाळ हायस्कूल), प्रयाग दामले (वेतोरे हायस्कूल), महादेव सावंत (माणगांव हायस्कूल), प्रथमेश वेंगुर्लेकर (लक्ष्मीनारायण बिबवणे), योगेंद्र तांडेल (उभादांडा हायस्कूल).

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जागृतीचे अध्यक्ष संजय मालवणकर, सचिव अमोल सावंत, विठ्ठल मालवणकर, संजिवनी परब, दिलीप मालवणकर, आनंद गावडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: good response to drawing competition