"विकासाबाबत राज्यकर्त्यांना काही कळत नाही"

नव्याने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आमदार श्री. राणे बोलत होते
 nitesh rane
nitesh rane sakal

देवगड : राज्याकडे पैसा नसल्याने राज्य शासन निश्क्रिय बनले आहे. विकासाबाबत राज्यकर्त्यांना काही कळत नाही. त्यामुळे विकासात्मक मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेने तयारी ठेवली पाहिजे, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी आज येथे केले. येथे अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाना बांधून जिल्हा परिषदेने क्रांतीकारक पाऊल उचलले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आमदार श्री. राणे बोलत होते. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, पंचायत समिती सदस्य सुनील पारकर, अजित कांबळे, जयश्री आडिवरेकर, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, प्रकाश राणे, संदीप साटम, पशुधन विकास अधिकारी डॉ. माधव घोगरे, डॉ. विवेक ढेकणे यांच्यासह अन्य नगरसेवक तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

 nitesh rane
"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिन्हं नाहीत" - मुंबई महापालिका

आमदार राणे यांच्या हस्ते इमारतीच्या नामफलकाचे अनावरण झाले तर राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते फीत कापून इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी आमदारांसह मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आमदार श्री. राणे म्हणाले, तालुक्याच्या ठिकाणी मोठा पशुवैद्यकीय दवाखाना झाला आहे. मोठा निधी खर्च करून त्याची उभारणी झाली आहे. त्यामुळे उर्वरित कामाकडे बारकाईने लक्ष देऊन पुर्तता करून घ्यावी. भविष्यात केंद्रीयमंत्री नारायण राणे तालुका दौर्‍यावर आल्यावर त्यांना इमारत दाखवण्यासाठी आणले जाईल असे सांगितले.

संजना सावंत यांनी, तालुका विकासात्मक कामात अग्रेसर असावा असा आमदार राणे यांचा आग्रह असल्याचे सांगितले. राजेंद्र म्हापसेकर यांनी, अधिकार्‍यांनी मुख्यालयी राहून दवाखान्याच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकर्‍यांना चांगली सेवा देण्याचे आवाहन केले. सुत्रसंचालन मधुसुदन घोडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com