शासकीय कर्मचारी अपघातात ठार

शनिवार, 20 एप्रिल 2019

कणकवली - निवडणूक कामकाज आटोपून घरी जाताना मोटारीची धडक बसल्याने निर्भय लक्ष्मण मयेकर (वय ५३, सध्या रा. जानवली, शिक्षक कॉलनी, मूळ बांदा, देऊळवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना काल (ता. १८) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मयेकर पाटबंधारे खात्यात नोकरीला होते.

महायुतीची सभा आटोपल्यानंतर जेवण आटोपून मयेकर चालत घरी जात होते. रात्री साडेदहाच्या सुमारास कसाल ते नांदगावच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीने (एमएच ०७ सी ८१९८) त्यांना मागून धडक दिली. यात मयेकर जागीच कोसळले. मोटार चालकही थांबला. त्यानंतर जखमी मयेकर यांना स्थानिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या छातीला मार लागला होता. अपघातानंतर लगेच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न असफल ठरल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. 

मोटार चालक संतोष बाबू बिर्जे (रा. बुधवळे, ता. मालवण) पळून जाऊ नये, यासाठी स्थानिकांनी त्याला रात्री पोलिस ठाण्यात हजर केले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला आज न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन मिळाला.