पालीत सरकारी कर्मचार्‍यांना पर्यटकांकडून बेदम मारहाण

अमित गवळे  
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये बरोबरच काही टारगट पर्यटकांच्या गुंडगिरीचे प्रमाण देखील वाढतांना दिसत आहे. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वरचे स्थान असलेल्या पालीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास रविवारी (ता.9) भाविकांनी मारहाण केली. तर, महिला एस.टी कर्मचार्‍याला देखील गडकिल्ले ट्रेकिंगसाठी ठाण्यातून आलेल्या ग्रुपमधील एका तरुणीने मारहाण केली. 

पालीत मद्यपी व नशेत धुंद झालेल्या चार पर्यटक तरुणांनी शनिवारी (ता.8) अरुण सखाराम कोंजे या विजविरण कर्मचार्‍याच्या डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. या पाठोपाठ पाली ग्रामपंचायतीमार्फत यात्रेकरुकडून कर गोळा करणारा कर्मचारी सतिष अनंत लांगी (रा. बुरमाळी) याला आपले कर्तव्ये बजावत असताना ठाणे येथून आलेल्या काही पर्यटकांनी रविवारी (ता.9) मारहाण केली. तर महिला एस.टी कर्मचार्‍याला देखील गडकिल्ले ट्रेकिंगसाठी ठाण्यातून आलेल्या ग्रुपमधील एका तरुणीने मारहाण केल्याची घटना घडली.

कर्मचार्‍यांना व स्थानिकांना मारहाणीच्या घटनेतनंतर पाली पोलीस स्थानिकांत गुंड प्रवृत्तीच्या पर्यटकांविरोधात तक्रार देण्यासाठी तक्रारदारांसमवेत त्यांच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी सोमवारी (ता.10) मोठी गर्दी केली होती. मागील आठवड्यात श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावर दारु पिऊन धुडगूस घालणार्‍या व कायदयाचे उल्लंघण करणार्‍या पर्यटकांकडून पोलीस निरिक्षक खेडेकर यांना मारहाण झाली होती. पर्यटकांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पोलीसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अशातच पर्यटकांनी मर्यादेत राहावे. ''स्थानिकांना हात लावाल तर, याद राखा.'',असा इशारा येथील संतप्त तरुण व ग्रामस्तांनी दिला आहे. पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांनी या घटनेनंतर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवाहन केले. 

Web Title: Government employees in Pali hit breathlessly by tourists