सरकारची ‘टिव टिव’ जास्त; कृती शून्य!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

रत्नागिरी - गेल्या अडीच वर्षांत केंद्र आणि राज्य शासनाची ट्विटरवर फक्त टिव टिव सुरू आहे. प्रत्यक्षात कृती शून्य. नोटाबंदीनंतर अनेकांना अनुभव आला की हे फक्त बोलघेवडेपणा आणि घोषणाबाजीत माहीर आहेत. शिक्षण क्षेत्राच्या विरोधात या शासनाचे धोरण आहे. शिक्षणमंत्री सभागृहात काहीही बोलतात. हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर लाठीहल्ला करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. त्यामुळे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघावरील भाजपची मक्तेदारी मोडी काढा,  असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

पुरोगामी शिक्षक आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेकापचे सर्वेसर्वा जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, आमदार संजय कदम, माजी आमदार श्री. पाटील, उमेश शेट्ये, बाळाराम पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, शिक्षक आदी उपस्थित होते. 

श्री. तटकरे म्हणाले, ‘दीड ते दोन वर्षांपासून याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे योगदान असलेल्या बाळाराम पाटील यांचे नाव कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निश्‍चित केले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. आमदार रामनाथ मोते दोनवेळा निवडून आले; पण शिक्षकांचे किती प्रश्‍न सुटले. शिक्षणमंत्री सभागृहात वाट्टेल ते वक्तव्य करतात. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले. शिक्षकांना अतिरिक्त ठरविले. या निवडणुकीत त्यांची मक्तेदारी मोडीत काढा. शिवसेनेनेदेखील उमेदवार देण्याचा विचार केला आहे. सेनेचा शिक्षण क्षेत्राशी फारसा संबंध नाही. त्यांनीदेखील उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे; पण मी ग्वाही देतो की बाळाराम पाटील उत्तम उमेदवार आहेत.’  

बाळाराम पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची नाही तर पहिल्या क्रमांकाची मते घेऊनच निवडून आणण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. येत्या दहा ते बारा दिवसांमध्ये पूर्ण ताकदीने काम करून आपल्याला हा बदल घडवायचा आहे. आमदार संजय कदम यांना मी आश्‍वस्त करतो की, श्री. पाटी सरकारची ‘टिव टिव’ जास्त; कृती शून्य! ल आमदार झाल्यावर आपल्याला निधीच्या बाबतीत झुकते माप देतील.

Web Title: Government tiv tiv more; Action zero