ग्रा.पं. कर्मचाऱ्याला मारहाण; दोन वर्षे सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

रत्नागिरी- देवधे (ता. लांजा) येथील ग्रामपंचायत परिसरात अवैद्य धंद्याविरुद्ध नोटीस बजावणाऱ्या शिपाई व सदस्यास मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला नागरी संरक्षण कायद्यांतर्गत दोन वर्षाचा सश्रम कारावास व पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. जिल्ह्यातील नागरी संरक्षण कायद्यांतर्गत शिक्षा होण्याची पहिलीच घटना आहे.

रत्नागिरी- देवधे (ता. लांजा) येथील ग्रामपंचायत परिसरात अवैद्य धंद्याविरुद्ध नोटीस बजावणाऱ्या शिपाई व सदस्यास मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला नागरी संरक्षण कायद्यांतर्गत दोन वर्षाचा सश्रम कारावास व पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. जिल्ह्यातील नागरी संरक्षण कायद्यांतर्गत शिक्षा होण्याची पहिलीच घटना आहे.

प्रमोद यशवंत गुरव (वय 29, रा. गुरववाडी-देवधे, ता. लांजा) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 25 नोव्हेंबर 2015 ला सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली होती. गावात अवैध धंदे, चायनीज गाड्या यासंदर्भात देवधे ग्रामपंचयातीकडे परिसरातील अवैध धंद्यांविरोधात संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी नोटीस काढली होती. ती बजावण्यासाठी शिपाई सावजी गुणाजी हरमले गेले होते. त्यावेळी शिपायांकडून नोटिसा आरोपी गुरव यांनी हिसकावून घेतल्या व शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. हा प्रकार हरमले यांनी ग्रामपंचायतीमध्ये सांगितला. यासंदर्भात ग्रामपंचायतीची सभा झाली. सभेत मदतनीस शंकर गणाजी कांबळे व सदस्य अनंत गुणाजी भातडे या दोघांनी आरोपीकडून नोटीस परत आणण्याचे ठरले. मात्र आरोपीने अनंत भातडे यांना घरात खेचून मारहाण केली. घराबाहेर उभे असलेले शंकर कांबळे यांनी त्याला मारू नको असे सांगितले. म्हणून आरोपीने त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली.
घडलेल्या प्रकारावरून शंकर गुणाजी कांबळे यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास लांजाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी एम. एन. जगताप यांच्याकडे सुपूर्द केला. तपासात आरोपीकडून नोटीसीची प्रत जप्त केली. सहायक सरकारी वकील अभियोक्ता ऍड. अनिरुद्ध फणसेकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी शिक्षा ठोठावली.

सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या
नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कलम 7 (1) व (ड) अन्वये आरोपीस सहा महिने सश्रम कारावास पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास साधा कारावास, कलम 342 अन्वये सहा महिने सश्रम कारावास, 5 हजार दंड व दंड न भरल्यास 1 महिना कारावास, कलम 504 अन्वये एक वर्षे सश्रम कारावास 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना कारावास, 506 मध्ये 2 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना कारावास अशी शिक्षा ठोठावली. या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहे. नागरी संरक्षण कायद्यांतर्गत जिल्ह्यात प्रथम अशी शिक्षा झाली आहे. 323 (3) व 10 मधून आरोपीची मुक्तता केली आहे.

Web Title: gram panchayat employee slap