भारतीयांना योग परंपरेचा महान वसा - श्रीपाद नाईक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पणजी : भारताच्या आरोग्य परंपरेने भारतीयांना योगाचा महान वसा दिला आहे. निरोगी आयुष्यासाठी आपण हा वसा पुढे नेला पाहिजे. आपल्या आणि आपल्या भावी पिढीच्या आरोग्यासाठी योगाला आपलेसे केले तर भारताची प्रत्येक पिढी धडधाकट होईल, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्‍त केले. आयुष मंत्रालय आणि राज्य आरोग्य संचालनालयातर्फे योग घराघरांत पोचावा म्हणून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यानिमित्त आज महाविद्यालयीन युवक युवतींनीही रॅली काढली. या रॅलीची सुरवात राज्य आरोग्य संचालनालयासमोर मंत्री श्रीपाद नाईक यांच्या खास उपस्थितीतीत झाली. 

आजपासून राज्यात योगाचा प्रचार करण्यासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत. 21 जून रोजी श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअमवर योगाची माहिती प्रात्यक्षिकांसह देणारा महत्त्वाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून सर्वांनी या कार्यक्रमाला आपली हजेरी लावावी. आयुष मंत्रालयातर्फे योगाचे खास प्रशिक्षण देणारे कार्यक्रम गोव्यासह देशभरात आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या योगप्रशिक्षणाचाही समावेश असल्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले. ही रॅली आरोग्य संचालनालयापासून कदंब बसस्थानकापर्यंत काढण्यात आली. वरून कोसळणाऱ्या धोधो पावसातही या विद्यार्थ्यांचा उत्साह मावळला नसल्याचे सकारात्मक चित्र या रॅलीमुळे दिसून आले. 

Web Title: Great fat of yoga traditions to Indians - Shripad Naik