रत्नागिरीतील शाळा ग्रीन झोनमध्ये आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

स्वच्छ भारत अभियान - सर्वच्या सर्व ७० शाळांना पुरस्कार

रत्नागिरी - स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा आघाडीवर आहे.

ऑनलाइन नोंदणीत सहभागी झालेल्या सर्वच्या सर्व ७० शाळा स्वच्छ असल्याचा निर्वाळा शासनाने दिला आहे. त्या शाळांची नोंद ग्रीन झोनमध्ये करण्यात आली आहे. पुढील वर्षी अशी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरामध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. शहरे आणि ग्रामीण भाग हागणदारीमुक्‍त करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संकल्पना देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक कार्यालयात स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर होता. त्यानुसार शिक्षण विभागाकडूनही प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. शाळांनी याची ऑनलाइन नोंदणी शासनाच्या वेबसाइटवर करावयाची होती. त्याचे निकषही जाहीर केले होते. प्रत्येक शाळेत पाण्याची उपलब्धता, शौचालयांची व्यवस्था, हात धुण्यासाठी विद्यार्थी संख्येनिहाय व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तणूक व क्षमता विकास यासाठी १०० गुण ठेवण्यात आले होते. ही माहिती ऑनलाइन भरावयाची होती. रत्नागिरी जिल्ह्यातील अर्ज भरणाऱ्या सर्वच्या सर्व ७० प्राथमिक शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यातील एक शाळा राष्ट्रीयस्तरावर निवडली जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा हागणदारीमुक्‍त आणि निर्मल ग्राम अभियानात अग्रेसर आहे. राज्यातील सहभागी झालेल्या शाळांमध्ये रत्नागिरी आघाडीवर आहे. या सर्व शाळांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यातील काही शाळा रेड झोनमध्ये समाविष्ट केल्या आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.

ग्रीन झोनमध्ये समाविष्ट तालुकानिहाय शाळा
चिपळूण    ८
दापोली     ३
गुहागर     ६
खेड      २
लांजा     ३
राजापूर     १०
रत्नागिरी    २७
संगमेश्‍वर    ११

Web Title: Green Zone in Ratnagiri school ahead