कावळ्या बावळ्या खिंडीत जाग्या झाल्या पराक्रमाच्या आठवणी

अमित गवळे 
बुधवार, 27 मार्च 2019

पाली - मराठ्यांच्या पराक्रमाचा दुर्लक्षित व ज्वलंत इतिहास जागृत करण्यासाठी व दुर्लक्षित वीरांना अभिवादन करण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानने नुकतीच कावळ्या बावळ्या खिंड मोहिम योजित केली होती. इतिहासाचा वारसा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे संक्रमित व्हावा हा उद्देश देखिल मोहिमेचा आहे. 

यावेळी शिवकालीन युद्धकला पथकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. कोल्हापूर वरून आलेल्या अवघ्या ७-८ वर्षांपासून १७-१८ वर्षाच्या मुलींनी लाठीकाठी व दांडपट्टा चे सादरीकरण करून शेकडो उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. 

३-४ वर्षांपूर्वी दुर्गवीरांच्या निदर्शनास आले की कावळ्या बावळ्या खिंडीच्या पायथ्याशी असलेल्या संदोशी गावात काही अज्ञात वीरांच्या विरगळी अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्या आहेत. अधिक माहिती काढली असता या खिंडीत लढल्या गेलेल्या वीरांच्या पराक्रमाच्या आठवणीत या विरगळी उभारल्या असाव्यात असा निष्कर्ष निघाला होता. दुर्गवीरांनी स्थनिकांना सोबतीला घेऊन या विरगळी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले. तात्पुरते छप्पर उभारून विरगळींची अजून झीज होणार नाही याची काळजी घेतली. या खिंडीत लढलेल्या ज्ञात अज्ञात वीरांच्या पराक्रमाची आठवण म्हणून गेली ३ वर्ष मानवंदना मोहीम ठेवण्यात येते. यावर्षी मुंबई, कोल्हापूर, पुणे येथील दुर्गवीर सदस्य आणि स्थानिक उपस्थित होते. 

 घोडखिंड ,उंबरखिंड ,नेसरीची खिंड अशा कितीतरी खिंडी पराक्रमाने पावन झाल्या आहेत. त्यापैकीच एक "कावळा बावळा खिंड" एक छोटीशीच लढाई पण ती नसती झाली तर आज इतिहास वेगळा असता. 

कावळ्या बावळ्या खिंडीचा रणसंग्राम 
पानशेतहून सह्याद्रीची कोकणादिवा कडून सांदोशी मार्फत रायगडला जाणारी वाट कावल्या-बावल्या खिंडीतुन जाते. या घाटवाटेला कावळ्या घाट असेही म्हणतात. औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला शंभुराजांना ठार मारले. त्यानंतर लगेचऔरंगजेबाच्या हुकुमानुसार जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला. याच वेळी संपूर्ण राज घराणे येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई तसेच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले. जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी शहाबुद्धीन खान हा सरदार पानशेतहुन कावल्या-बावल्याच्या खिंडीतून रायगडकडे निघाला. त्या मोगली सरदाराची खबर सांदोशी गावातले गोदाजी जगताप व जिवाजी सर्कले नाईक यांना लागली. त्यांनी अापल्या नऊ साथीदारांसह शहाबुद्धीन खानास कावल्या-बावल्या खिंडित गाठले अाणि त्याचे खुप सैन्य कापून काढले. उरलेले सैन घेऊन शहाबुद्धीन औरंगजेबाकडे पळला. परिणामी राजाराम महाराज कड्यावरून सुरक्षित वाटेने सुटले. आणि स्वराज्य अस्मियतेची लढत कायम झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Greeting campaign by Durgvir Pratishthan