भारतासह 5 देशांतील गडकिल्यांना एकाचवेळी अभिवादन

pali.
pali.

पाली - शिवाजी ट्रेल व शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान सुधागड यांच्या तर्फे रविवारी (ता.24) किल्ले सुधागड आणि सरसगडावर दुर्गमहापुजा करण्यात आली. यावेळी शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली.

शिवाजी ट्रेलच्या वतीने देशभराती 131 किल्ल्यांवर तसेच अमेरिका, ओमान, कॅनडा, सिंगापूर व दुबईतील किल्यांवर देखील हे कार्यक्रम एकाच वेळी घेण्यात आले. सुधागड किल्यावर शनिवारी रात्री (ता.23) रांगोळी काढून व पणत्या लावून सरदार घराण्यांचे वंशज व माजी सैनिक सुनील थळे यांच्या उपस्थितीत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रविवारी (ता.24) दोन्ही दुर्गांची साफसफाई करून गडसंवर्धन करण्यात आले. तसेच महादरवाज्यावर फुलांचे तोरण बांधण्यात आले, झेंडे लावले रांगोळी काढली गेली. पूजन म्हणजे किल्ल्याची साफ सफाई करणे, वास्तुची स्वच्छता करणे व प्रार्थना करणे आदी गोष्टींचा समावेश आहे. त्यांनतर सत्यनारायण पूजा करण्यात आली. सरसगडावर देखील अशा स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सत्यजितराजे दाभाडे, सुरजराजे जाधव, हिमांशू पवार, पुष्कर शिवाले पाटील, आकाश कंक, उदयसिंहराजे जाधवराव, संभाजीराजे जाधवराव, शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान अध्यक्ष पराग मेहता, सुजित बारसकर, आरिफ मणियार, ऋषी झा, दर्शन चोरघे, केतन म्हस्के,आशीष पालांडे, अरविंद दंत, सुजाता क्षीरसागर, संचालक शिवाजी ट्रेल, मुकुंद उत्पात, संचालक शिवाजी ट्रेल, गणेश राईकर, अध्यक्ष दुर्ग महा पूजा, गिरीश जोशी, प्रतिनिधी दुर्ग पूजा आयोजन समिती, महाराष्ट्र उपस्थित होते. या उपक्रमास शेकाप आमदार धैर्यशील पाटील व जिप सदस्य व भोराई ट्रस्ट अध्यक्ष सुरेश खैरे आणि भोराई देवस्थान ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभले.

लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नोंद
शिवाजी ट्रेल तर्फे गेले 21 वर्ष फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी गड पुजेचे कार्यक्रम घेतले जाते. 2016 साली या मध्ये 121 किल्ल्यांच्या समावेश होता त्या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. यावेळी रायगड जिल्ह्यात सुधागड, सरसगड, घोसाळा, कर्नाळा, अवचितगड, बिरवाडी, थळ, खांदेरी, उंदेरी, कुलाबा, सर्जेकोट, राजकोट, चौल, रेवदंडा, कोरलाई, जंजिरा, तळगड, रायगड अशा १८ किल्ल्यांवर दुर्गपूजा झाली. देशभरात 50 हून जास्त सरदार घराणी स्वतःहा पूजेसाठी उपस्थीत होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com