कशामुळे झाली एलईडी मासेमारी बंद...?

Guardian Minister Uday Samant Order For LED Fishing Stop In Sindudurg Kokan Marathi News
Guardian Minister Uday Samant Order For LED Fishing Stop In Sindudurg Kokan Marathi News

ओरोस (सिंधुदूर्ग) : जिल्ह्यातील मच्छीमारांना एलईडी मासेमारी नको आहे. त्यामुळे जिल्ह्यात एलईडी मासेमारी बंदच झाली पाहिजे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी मत्स्य खात्याला दिले. एलईडी मासेमारीवर मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास तुमची वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करून तुमच्यावर कारवाई करणार, असा इशारा देतानाच परराज्यातील ट्रॉलर्स राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये घुसखोरी करून मासळी पळवतात, त्यांना रोखण्यासाठी लवकरच जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रामध्ये हायस्पीड नौका दाखल होणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
 
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मच्छिमारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, नागेंद्र परब, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. 

लवकरच हाय स्पीड नौका उपलब्ध


यावेळी पालकमंत्री सामंत यांनी मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्याच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या या परराज्यातील ट्रॉलर्सचा पाठलाग करुन त्या पकडण्यासाठी लागणाऱ्या नौका आपल्या पोलीस दलाकडे नसल्याचे सांगून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांसाठी लवकरच हाय स्पीड नौका उपलब्ध होणार आहेत. या नौका आल्यानंतर या परराज्यातील घुसखोरी करणाऱ्या नौकांना पकडणे सहज शक्‍य होणार आहे. तसेच जीपीएसच्या माध्यमातून या नौका ट्रेस करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिक्षक गेडाम यांना दिल्या. यावेळी मच्छिमार संघटनेने समुद्रामध्ये ड्रोनच्या माध्यमातून गस्त घालण्याची मागणी केली. त्यावर अशाप्रकारे गस्त घालणे शक्‍य नाही. त्यासाठी अत्याधुनिक नौकाच हव्यास असे पालकमंत्री सामंत म्हणाले.

 ...तर अधिकाऱ्यांची तक्रार 
जिल्ह्यात एलईडी मासेमारी नको असल्यास ती आम्हाला पण नको; मात्र मत्स्य खाते कारवाई करण्यास कमी पड़ते यात आम्ही बदनाम होतो; परंतु आता तसे चालणार नाही. जिल्ह्यात एलईडी मासेमारी बंदच करा. येत्या आठ दिवसात त्यावर कार्यवाही करा असे आदेश पालकमंत्र्यांनी मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले.  मत्स्य खात्याच्या कारभारबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. एलईडी मासेमारीवर मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास तुमची वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करून तुमच्यावर कारवाई करणार, असा इशारा यावेळी पालकमंत्र्यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. 
हेही वाचा-  नितेश राणे म्हणाले ; यामुळे मोडला कोकणच्या विकासाचा कणा ....

मेडिकलसह इंजिनिअरींग कॉलेज 
आपल्या जिल्ह्यात मेडिकल, इंजिनीअरिंग आदि सरकारी महाविद्यालये जिल्ह्यात यापूर्वीच यायला हवी होती; मात्र काहींनी स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी कॉलेज न आणता आपली खासगी कॉलेज आणली. आपण तसे करणार नाही. जिल्ह्यात सरकारी मेडिकल आणि इंजिनीअरिंग कॉलेज आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत प्रायव्हेट कॉलेजवाल्यांना शुभेच्छा, असे सामंत म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com