श्री ज्ञानेश्वर माऊली दिंडी काढून नववर्षाचे स्वागत

लक्ष्मण डुबे 
रविवार, 18 मार्च 2018

पाताळगंगा नदीच्या तिरा वरील कराडे खुर्द येथील श्री रामेश्वर मंदिरात सकाळी पुजा आरती करण्यात आली. त्यानंतर टाळ, मृदुंगाच्या गजरात हाती विठ्ठल नामाचा गजरात दिंडी निघाली होती.

रसायनी - अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील चावणे पंचक्रोशितील वारकऱ्यांनी रविवारी (ता. 18) परीसरात गुढीपाढव्या निमित्त श्री ज्ञानेश्वर माऊली दिंडी काढून नववर्षाचे स्वागत केले. दिंडीचे हे आठवे वर्ष आहे. 

पाताळगंगा नदीच्या तिरा वरील कराडे खुर्द येथील श्री रामेश्वर मंदिरात सकाळी पुजा आरती करण्यात आली. त्यानंतर टाळ, मृदुंगाच्या गजरात हाती विठ्ठल नामाचा गजरात दिंडी निघाली होती. मार्गावरील चांवढोली, कराडे बुद्रुक, जांभिवली, सवने, चावणे, कालिवली आणि कासप या मार्गा वरील गावांत दिंडी नेण्यात आली. या गावातील ग्रामस्थांनी दिंडीच्या स्वगता साठी गल्लीत रांगोळ्या काढून केले. तर कासप येथेे सायंकाळी ह. भ. प. रामचंद्र पाटील यांच्या किर्तनाने दिंडीची सांगता होईल असे सांगण्यात आले. तर दिंडीचे नेतृत्व ह. भ. प. मारूती महाराज पाटील यांनी केले होते. 
 

Web Title: gudhipadwa celebration shree dhyaneshavr mauli dindi welcome to hindu new year

टॅग्स