स्फोटकांसह गावठी बंदूक जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

खेड - तालुक्‍यातील तळे चंदनवाडी येथे खेड पोलिसांनी छापा टाकून स्फोटकांसह एक गावठी बंदूक हस्तगत केली. ही कारवाई रविवारी (ता.9) रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली. खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, ""एका खबऱ्याकडून तळे चंदनवाडी येथील सीताराम रामचंद्र बाईत (वय 30) यांच्या घरी स्फोटके तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व दारूगोळा जमा केल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिस काल दुपारपासूनच माहिती गोळा करू लागले. गावचे पोलिसपाटील चंद्रकांत मोरे, पांडुरंग शिंदे यांच्याकडे चौकशी केल्यावर रात्री बाईत याच्या घरी जाण्यासाठी पथक बनवले. गावात पोचल्यावर बाईतचे घर गाठले. अंगणात पोलिसपाटील व तंटामुक्त अध्यक्ष तसेच पोलिसांना बघताच तो मागच्या दाराने जंगलात पळाला. त्यानंतर घराची झडती घेतली. घराच्या पडवीतील अडगळीत दोन किलो 78 ग्रॅम वजनाच्या व 83 एमएम लांबीच्या दोन जिलेटीन काड्या, पाच डिटोनेटर व गन पावडरचे छरे असलेल्या दोन डब्या मिळाल्या. आतील बंद खोलीत एक गावठी ठासणीची बंदूकही आढळली.''
Web Title: gun seized in khed