वाडा पोलिसांच्या धडक कारवाईत 60 लाखांचा गुटखा जप्त

ok.jpg
ok.jpg

वाडा : गुजरातमधील वापीहून महाराष्ट्रात अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर वाडा पोलिसांनी सोमवारी (दि.24) सायंकाळी पकडण्यात आला आहे. या कंटेनर मधील सुमारे 60 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. इंतजार वासीद अली (22) या आरोपीस अटक केले आहे. 

वाडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गुजरात मधील वापीहून ट्रक (कंटेनर क्रमांक एम. एच. 04 जे यू 6429) यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा वाहतूक होत असल्याचे समजले. त्यानंतर वाडा पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी भिवंडी - वाडा मार्गावर एक विशेष पोलिस पथक तयार करून या मार्गावर गस्त सुरु ठेवली. सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास या कंटेनरला अडविण्याचा प्रयत्न केला. कंटेनर चालकाने ट्रक न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी  ट्रकचा पाठलाग करून वाडा हद्दीतील सापना येथे हा ट्रक अडविला. कंटेनरची तपासणी केली असता, कंटेनरमध्ये 40 ते 50 मोठमोठ्या गुटख्याने भरलेल्या गोणी आढळल्या. आजच्या बाजारभावानुसार या गुटख्याची किंमत 59 लाख 60 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 या प्रकरणी इंतजार या आरोपीस अटक करण्यात आली असून अन्न आणि औषध प्रशासन कायदा 2006 व भारतीय दंड विधान संहिता कलम 328 अंतर्गत वाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ हे करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com