वाशी बाजारात हापूसला डझनाला एक हजार ५० रुपये दर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

रत्नागिरी - फळांचा राजा हापूसचे वाशी मार्केटमध्ये तीन महिने आधीच आगमन झाले आहे. आठ-दहा दिवसांनी रत्नागिरी जिल्ह्यातील किनारीपट्टीमधील गावांमधून पेट्या जातात. पावसाळ्यात आंबा आल्याने त्यावर ॲथ्रॅक्‍सनोजचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या डझनाला एक हजार ५० रुपये दर मिळत आहे. बहुतांश फेब्रुवारी, मार्चमध्ये रत्नागिरीतून पेट्या रवाना होतील, असा अंदाज आहे. 

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे हापूस वाशी बाजारात यायला सुरवात होते. यंदा तीन महिने आधी आंबे बाजारात येऊ लागले आहेत. सध्या बाजारात येत असलेला आंबा नियमित हंगामात सापडलेल्या मानकांसारखा नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नोव्हेंबरमध्ये हापूस एवढ्या प्रमाणात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, त्याला दर पाहिजे तेवढा मिळालेला नाही. पावसातील आंबा असल्याने त्यावर रोगांचा प्रादुर्भाव आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील मालवी आंबा वाशीत येत असल्याने त्याचाही परिणाम हापूसच्या दरावर होऊ शकतो. मालवी आंब्याला डझनाला एक हजार ५०० रुपये दर मिळत आहे. तुलनेत हापूसला तेवढा दर मिळालेला नाही. हंगामात हे चित्र बदलेल, अशी आशा आहे.

ऑगस्टमधील वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. त्या कालावधीत काही झाडांना फुले आलेली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये कडकडीत ऊन पडल्याने मोहोराला पोषक वातावरण मिळाले आणि तेथे फळे तयार झाली. त्यातूनच उत्पादन हाती येत आहे. आतापर्यंत वाशीत पाठविलेल्या पेट्या हर्णै, कासारवेली, राजापूर येथील किनारी भागातील बागांमधील आहेत. समुद्राच्या किनारपट्टीवर थेट आलेल्या वाऱ्यांमुळे आंबा कलमांना मोहोर आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

थंडीमुळे दिलासा
थंडीला सुरवात झाल्याने आंबा बागायतदारांना दिलासा मिळत आहे. दापोलीत पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. हे वातावरण असेच राहिले तर मार्चच्या अखेरीस आंबा मार्केटमध्ये येईल, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्‍त केला.

Web Title: Hapus Mango in Washi Market