एसटीचे खासगीकरण होऊ देणार नाही - हरी माळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

सावंतवाडी - एसटीचे खासगीकरण करून, एसटी आगाराची मालमत्ता विकण्याचे पाप सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, मात्र काही झाले तरी एसटीचे खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा मनसेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष हरी माळी यांनी आज येथे दिला.

सावंतवाडी - एसटीचे खासगीकरण करून, आगाराची मालमत्ता विकण्याचे पाप सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, मात्र काही झाले तरी एसटीचे खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा मनसेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष हरी माळी यांनी आज येथे दिला.

शिवशाहीचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक झाला आहे. त्याला नवशिके चालक जबाबदार आहेत. त्यामुळे वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी मनसे आक्रमक भूमिका घेणार आहे, असेही माळी यांनी सांगितले. 

श्री. माळी जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी येथील आगाराची पाहणी केली. तत्पूर्वी पर्णकुटी विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष  राजू कासकर, संतोष भैरवकर, अतुल केसरकर, सुनील जाधव, बनी नाडकर्णी, राहुल मेंडे, आशिष सुभेदार, सुधीर राऊळ आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. माळी म्हणाले, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून एसटीचे खासगीकरणाचा घाट घातला जात आहे, हा प्रकार आम्ही कधी यशस्वी होऊ देणार नाही. कामगारांची पिळवणूक सुरू आहे.  संघटनेच्या नावावर कामगारांना न्याय दिला जात नाही. हा सर्व प्रकार सहन केला जाणार नाही. यासाठी मनसे कधीही आंदोलन करू शकते. जिल्ह्यात सुद्धा एसटीचे प्रश्न गंभीर झाले आहेत. प्रवाशांना योग्य ती सेवा दिली जाते. शौचालयाचा प्रश्न आहे. जुन्या झालेल्या एसटी बस अद्यापही वापरत आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यातील जुन्या बस बदलून घ्याव्यात, अशी प्रमुख मागणी आमची असणार आहे, असे माळी यांनी सांगितले 

कुडाळ बसस्थानकाचे गरज नसताना काम 

नाडकर्णी म्हणाले, कुडाळ यांनी बसस्थानकाचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू केले आहे. त्या ठिकाणी गरज नसताना नूतनीकरण केले जात आहे. प्रवाशांना रस्त्यावर आणण्याचे काम प्रशासनाने केले आहे, असा आरोप केला

Web Title: Hari Mali comment