एसटी महामंडळात दिवाकर रावतेंची दंडुकेशाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

रत्नागिरी - एसटी महामंडळात मंत्री दिवाकर रावते शिवशाही नव्हे तर दंडुकेशाही करत आहेत. गेल्या चार वर्षांत एसटीची खासगीकरणाकडे वाटचाल करण्यास रावतेच जबाबदार आहेत. राज्यात व केंद्रात शिवसेना सत्तेत असूनही एसटीला डिझेलमध्ये सवलत किंवा टोलमाफी नाही. या झोपलेल्या कुंभकर्णाला मनसे जागे करणार असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण रा. प. कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष हरी माळी यांनी केला.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेस माळी यांनी रावतेंवर टीका केली. माळी म्हणाले, ‘‘गिरणी कामगारांपेक्षा एसटी कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. १ लाख ७ हजार कामगार देशोधडीला लागणार आहेत. रावते यांच्या खासगीकरणाच्या धोरणामुळे ही स्थिती उद्‌भवली आहे. 

महामंडळात सध्या २१ संघटना आहेत. मान्यताप्राप्त संघटना एकच आहे. मात्र कोणतीही संघटना कामगारांच्या प्रश्‍नांकडे लक्ष देत नाही. टायर खरेदी, डिझेल अशा मोठ्या खरेदीसाठी महामंडळाला सवलत मिळू शकते. पण जादा दराने खरेदी केली जाते. यामुळे महामंडळाचे नुकसान होत आहे, अशी टीका माळी यांनी केली.’’ उपाध्यक्ष सुनील जाधव, सुनील साळवी, महेंद्र नागवेकर, सुहास मिंडे, अमोल जाधव, सतीश खामकर, भाऊ पारकर उपस्थित होते.

आरटीओंना निवेदन
आरटीओंकडे दरवर्षी एसटीच्या गाड्या पासिंगला जातात. मात्र या गाड्यांची स्थिती चांगली नसतानाही पासिंग केले जाते. पुढील टायर रिमोल्ड केलेले असतात. यामुळे अपघात होतात. शिवशाहीचे चालक कंत्राटी व अप्रशिक्षित असल्याने अपघात वाढले आहेत. ही दंडुकेशाही असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ चालू आहे. याविरोधात आरटीओंकडे निवेदन दिल्याचे माळी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Hari Mali comment