सिंधुदुर्गनगरी : पुन्हा सेवेत घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा ठिय्या

कोरोना महामारीच्या कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची शासनाने अचानक सेवा समाप्त करून कोरोना योध्यांना धक्का दिला.
Agitation
AgitationSakal

सिंधुदुर्गनगरी - कोरोना महामारीच्या कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची शासनाने अचानक सेवा समाप्त करून कोरोना योध्यांना धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला पुन्हा सेवेत घ्यावे, या मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.

जिल्हयात वाढत्या कोरोना प्रभाव काळात शासनाकडुन कोविड सेंटर उभारण्यात आली. हे कोविड सेंटर कार्यरत ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना कोविड योध्या म्हणून नियुक्ती देण्यात आलेली होती. या कालावधीत कोरोना योध्दा म्हणुन कोरोनाची भिती न बाळगता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७२ कर्मचा-यांनी अविरतपणे काम केले आहे. यामध्ये स्टाफ नर्स, सर्व्हट, डाटा इंट्री ऑपरेटर, लॅब टेक्नीशियन, फार्माशिस्ट अशा विविध पदांवर सर्वजण कार्यरत होते; परंतु कोरोना काळात काम करुन देखील कोणतीही पूर्व सुचना न देता ३१ ऑगस्टपासुन शासनाकडून सेवा समाप्त केल्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे अचानक कामावरून कमी केल्याने या कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात काम केल्याने कायमस्वरूपी सेवेत समाउन घ्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. या मागणीसाठी आज पुन्हा जिल्हा परिषद समोर ठीय्या आंदोलन केले.

यामध्ये अमित वजराटकर, प्राजक्ता माळवदे, सुमेधा गावकर, रेश्मा नायर, हार्दिक कदम, सुमन सावंत यांच्यासह मोठ्या संखेने आरोग्य कर्मचारी (कोरोना योद्धा) सहभागी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com