कोरोना आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री लवकरच सिंधुदुर्गात

या महामारीने जिल्ह्यामध्ये 888 रुग्णांचा बळी घेतला, असे शासकीय आकडेवारी सांगते
कोरोना आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री लवकरच सिंधुदुर्गात

कणकवली : सिंधुदुर्गातील (sindhudurg district) ढासळत्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) लवकर सिंधुदुर्गात येणार आहेत. तशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी खासदार नारायण राणे (narayan rane) यांना दिली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांसह आरोग्य खात्यातील रिक्तपदे तातडीने भरा आणि सिंधुदुर्गवरील कोरोना (covid-19) संकट दूर करा, अशी मागणी राणे यांनी आरोग्य मंत्र्यांच्या भेटी वेळी केली असल्याची माहिती राणे संपर्क कार्यालयातून देण्यात आली.

सिंधुदुर्गातील वाढत्या कोरोना प्रादुभार्वाच्या अनुषंगाने माजी खासदार, भाजप नेते राणे यांनी काल (16) रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले की, रिक्त पदे, आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा अभाव आणि सरकारकडून होणार्‍या अनास्थेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या लाटेमध्ये भरडून निघाला आहे. 15 जून अखेरीस जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 35256 असून सक्रिय रुग्ण संख्या 6643 एवढी आहे. या महामारीने जिल्ह्यामध्ये 888 रुग्णांचा बळी घेतला आहे. असे शासकीय आकडेवारी सांगते. यातील 205 मृत्यू मागील 15 दिवसातील आहेत.

कोरोना आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री लवकरच सिंधुदुर्गात
'एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतरही सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या पदरी मृत्यूच आले'

कोरोनाच्या या जीवघेण्या महामारीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांचे पद रिक्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी ( गट अ ) च्या मंजूर 76 पदांपैकी 39 पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवकांची 97 पदे रिक्त आहेत कोरोनाची साथ एवढ्या तीव्रतेने पसरलेली असताना जिल्हा साथरोग अधिकाऱ्याचेही पद रिक्त आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये राज्य व जिल्हास्तरीय 878 पदांपैकी 318 पदे रिक्त आहेत. शासनाच्या अनास्थेमुळे जिल्ह्यातील नागरिक प्रक्षुब्ध झाले आहेत. आरोग्य सेवक नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाच रुग्ण सेवेसाठी थांबवून ठेवण्याचे प्रकार तर जिल्हाभर सर्वत्र आढळून आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला या भयंकर संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील आरोग्य सेवेची सर्व रिक्त पदे तातडीने भरणे, राज्याच्या कोविड टास्क फोर्सने जिल्ह्याला भेट देणे, मोठया प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबविणे, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करणे. सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध करणे यासाठी आवश्यक ती कारवाई तत्काळ करावी अशा मागणीचे निवेदन भाजप नेते खासदार राणे यांनी आरोग्यमंत्र्यांना दिले आहे.

कोरोना आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री लवकरच सिंधुदुर्गात
रत्नागिरीकरांना दिलासा; Lockdown बाबत मंत्री सामंतांचे वक्तव्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com