#KonkanRain गुहागरात पावसाने उडवला हाहाकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

गुहागर - मंगळवारी रात्री गुहागर शहरात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. 12 तासांत सुमारे 150 मि. मी.पेक्षा जास्त पाऊस झाला. शहरातील 10 घरांत रात्री पाणी घुसले. वरचापाट, खालचापाट, बाग परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. गुहागर मंडळात सर्वाधिक 250 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

गुहागर - मंगळवारी रात्री गुहागर शहरात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. 12 तासांत सुमारे 150 मि. मी.पेक्षा जास्त पाऊस झाला. शहरातील 10 घरांत रात्री पाणी घुसले. वरचापाट, खालचापाट, बाग परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. गुहागर मंडळात सर्वाधिक 250 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने मंगळवारी सायंकाळी 6 नंतर गुहागर शहराला झोडपले. परिणामी रात्री 10 नंतर शहरातील सखल भागात पाणी भरायला सुरवात झाली. वरचापाट येथील सोमेश्वर तळ्याकडे येणाऱ्या नाल्याने दिशा बदलली. त्यामुळे नरेंद्र वराडकर यांच्या घरात पाणी घुसले. साखवीवरील नयन गोयथळे यांच्या घरात 1 फूट पाणी होते. तर रमेश गोयथळे यांच्या घराच्या मागील पडवीत पाणी शिरले.

खालचा पाट भंडारवाडीच्या मागून दोन मार्गाने शेतातील पाणी समुद्राला जाऊन मिळते. घरांना नुकसान पोचू नये, म्हणून या दोन्ही नाल्यांची उंची व रुंदी वाढवून मजबूत बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, पावसामुळे नाले तुडुंब भरल्यानंतर गोयथळे वठारात पाणी शिरले. माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, नगरपंचायतीचे विद्यमान स्वच्छता व आरोग्य सभापती अमोल गोयथळे, अजित मोरे, नंदकुमार पाटील, राजेंद्र गोयथळे, जितेंद्र गोयथळे, अमित गोयथळे यांच्या घरात पाणी शिरले. 

नगराध्यक्ष, नगरसेवकांची भेट 
बाग परिसरात रस्त्यावरील पाणी जाण्याचे मार्ग बंद झाल्याने संपूर्ण रस्त्यावरून आरे पुलाकडे वेगाने पाणी वहात होते. साखवी, वरचापाट परिसर सखल असल्याने तेथेही रस्ताला नदीचे स्वरूप आले होते. खालचापाट येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाजवळील पुलावरून तसेच गोयथळे वठाराकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वहात होते. पहाटे पावसाचा जोर कमी झाल्यावर पाण्याचा निचरा झाला. बुधवारी सकाळी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी घरात पाणी शिरलेल्या ठिकाणांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in Guhagar