पालीतील रस्त्यांवर पाणी, नाले-गटारे तुंबली

अमित गवळे
सोमवार, 9 जुलै 2018

पाली (रायगड) : मुसळधार पावसामुळे सोमवारी (ता.9) येथील रस्त्यांवरून पाणी वाहत होते. तर नाले व गटारे तुंबल्यामुळे त्यातील पाणी देखील रस्त्यावर येत होते.  बस स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. यामुळे पालीतील जनजीवन विस्कळीत झाले होते.

येथील मधली आळी, बल्लाळेश्वर नगर, खडक आळी, सोनार आळी, आगर आळी, धुंदीविनायक नगर बुरुडआळी आदी ठिकाणी पाणी साठले होते. पाली बस स्थानकाला चहू बाजूने पाण्याने वेढले होते. तसेच नाले व गटाराचे पाणी देखील येथे साठले होते. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना या दूषित पाण्यातूनच जावे लागले.

दुषित पाणी रस्त्यावर
गावातील मोठे नाले व गटारे हे घाण-कचरा , झाडेझुडपे, वाळू , दगड आदी कारणामुळे भरली होती. अनेक ठिकाणची नालेसफाई न झाल्यामुळे व मुसळधार पावसामुळे येथील नाले व गटारे तुंबून यातील दूषित पाणी वाहून रस्त्यावर येत आहे. या पाण्याच्या प्रवाहाचा वेग देखील अधिक होता. या दूषित पाण्यातून पादचाऱ्यांसह, शाळकरी मुलांना वाट काढत जावे लागत आहे.

सोमवारी (ता.9) अंबा नदी दुथडी भरून वाहत होती. दुपारी बारा वाजताच्या सुमारास पुलाला घासून पाणी जात होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास दुपारनंतर पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. पावसाच्या संततधारेमुळे शनिवारी (ता.7) वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली जवळील अंबा नदी पुलावरुन पाणी गेले . त्यामुळे येथील काही सिमेंटचे संरक्षक कठडे  वाहून गेले. तर लोखंडी रेलिंग तुटले तर यातील काही रेलिंगचे पाईप पुलाजवळाच काढून ठेवले आहेत. संरक्षक कठडे नसल्यामुळे येथून वाहतूक करणे आता धोकादायक झाले आहे.

त्या खड्ड्यामुळे 4 अपघात
येथील मधल्या आळीतील लवाटे बिल्डींग जवळील रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे. गटाराचे पाणी वाहत असल्यामुळे खड्डा न दिसल्यामुळे 4 दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून अपघात झाला. स्थानिकांनी खड्डा दिसावा म्हणून खड्ड्यात मोठी काठी उभी करून बाजूला दगड लावले आहेत. मात्र तरी देखील खड्डा दिसत नाही. परिणामी पादचारी व विद्यार्थी जीव मुठीत घेऊन जात होते.
 
Web Title: heavy rain in pali rain water on road