एकीकडे कोरोनाचा विळखा आणि दुसरीकडे हे! व्यापाऱ्यांची स्थिती तर......

heavy rain sawantwadi, vengurla taluka sindhudurg district
heavy rain sawantwadi, vengurla taluka sindhudurg district

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली गेली आहे. यात व्यापारी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तळवडे बाजारपेठेतील निम्म्याहून अधिक दुकानांत पुराचे पाणी शिरून व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. 

एका बाजूने कोरोनाचे संकट असताना आता मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सर्वसामान्य व्यापारी यांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तळवडे येथील पूरस्थितीची पाहणी सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, पंचायत समिती माजी सभापती तथा विद्यमान सदस्य पंकज पेडणेकर, सरपंच संदीप आंगचेकर, ग्रामसेवक तृप्ती राणे, तलाठी श्रुती मसुकर, तसेच तळवडे व्यापारी संघाचे अध्यक्ष सद्‌गुरू डिचोलकर यांनी केली.

यावेळी सर्व महसूल अधिकारी उपस्थित होते. तळवडे गावात जी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्याचा पंचनामा करण्यात आला असून हा अहवाल प्रशासनाकडे पाठवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले. 

या पावसाच्या पाण्याचा मोठा फटका हा सावंतवाडी तालुक्‍यातील तळवडे बाजारपेठेला बसला. येथील अर्ध्यापेक्षा जास्त दुकानांमध्ये पाणी जाऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाकडून याची पाहणी करण्यात आली. 

तळवडे बाजारपेठेतील हा जो पावसाच्या पाण्याचा प्रश्‍न आहे तो दरवर्षी उद्‌भवतो. आता दुकानांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे फक्त कागदावरच राहतात आणि व्यापाऱ्यांना काहीही नुकसानभरपाई मिळत नाही. हा पाण्याचा प्रश्‍न जर प्रशासनाने नाही सोडवला तर दरवर्षी धंदा कसा करावा, हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
- अभिजित घाडी, मेडिकल दुकान व्यापारी. 

पावसाचे पाणी शिरून एवढे नुकसान झाले आहे की, यातून सावरणे कठीण आहे. अगोदरच कोरोनामुळे बाजारपेठ बंद व आता हे नुकसान. व्यापाऱ्यांनी उधारीवर सामान आणले असून आता हे भिजलेले सामान कसे विकायचे हा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे शासनाने यावेळी तरी नुकसानभरपाई द्यावी. 
- शंकर साळगावकर, कापड दुकान व्यापारी.  

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com