सिंधुदुर्गात पावसाचा जोर; कोकण रेल्वे उशिराने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016

कणकवली- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रीपरीप पावसानंतर जोर वाढला आहे. संपूर्ण कोकण पट्टीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, सकाळपासून ढगाळ वातावरणाने पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. परिणामी, कोकण रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. 

कणकवली- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रीपरीप पावसानंतर जोर वाढला आहे. संपूर्ण कोकण पट्टीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, सकाळपासून ढगाळ वातावरणाने पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. परिणामी, कोकण रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. 

जिल्ह्यात चोवीस तासात पाऊस कमी प्रमाणात होता. जिल्ह्यात एकूण आजचा सरासरी 13 मिमी. तर आतापर्यंत 3330.60 मिमी. इतकी सरासरी पावसाने गाठली आहे. पावसाचा जोर सकाळपासून वाढल्याने कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. मुंबईहून रात्री सुटलेली कोकणकन्या एक्‍स्प्रेस तीन तास, दादर सावंतवाडी दोन तास, सीएसटी ते मंगळूर मुंबई एक्‍स्प्रेस तीन तास, गरीब रथ दोन तास, तिरूणवेली एक्‍स्प्रेस पाच तास, रत्नागिरी मडगांव पॅसेंजर पाच तास उशिराने धावत होती. तर मुंबईहून आज सकाळी सुटणारी मांडवी एक्‍स्प्रेस तब्बल तीन तास उशिराने सोडण्यात येणार होती. 

जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत पावसाने चांगली साथ दिली असून बऱ्याच ठिकाणी मुसळधार वृष्टी आणि वादळामुळे तब्बल 88 लाख 62 हजार 653 रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची घरे, शेतावरील गोठ्यांचे 75 लाख 21 हजार 253, खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे 13 लाख 41 हजार 400 रुपयाचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती निवारण केंद्राकडे आहे. यंदा अतिवृष्टीमुळे 14 व्यक्ती आणि 25 जनावरांचा मृत्यू झाला असून, पडझडीत 452 घरे आणि 79 गोठ्यांचा समावेश आहे. अतिवृष्टीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आतापर्यत 36 लाख तर जनावरांच्या मालकांना एक लाख एक हजार रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप झाले आहे. 

आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजता घेतलेल्या नोंदीत तालुकानिहाय पाऊस मिमीमध्ये

 (आजपर्यंतचा एकूण पाऊस) असा - 

दोडामार्ग - 9 मिमी. (3260), 

सावंतवाडी- 34 मिमी.(3738), 

वेंगुर्ला - 14 मिमी. (3718.60), 

कुडाळ - 10 मिमी. (3218), 

मालवण - 15 मिमी. (3290), 

कणकवली - 29 मिमी. (3719), 

देवगड - 37 मिमी. (2927), 

वैभववाडी - 25 मिमी. (3625). 

Web Title: Heavy rain in Sindhudurga; Kokan Railway running late