मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

रत्नागिरी  : मुसळधार पाऊसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी घरा-गोठ्यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.

रत्नागिरी  : मुसळधार पाऊसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी घरा-गोठ्यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.
आज सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 31.89 मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड- 37, दापोली- 41, खेड- 42, गुहागर- 23, चिपळूण- 45, संगमेश्‍वर- 12, रत्नागिरी- 42, लांजा- 11, राजापूर- 34 मिमी नोंद झाली. दापोलीत पन्हाळेकाजी येथे एका गोठ्याचे सुमारे 16,200 रुपये, हर्णैतील उज्ज्वला तवसाळकर यांच्या घराचे 6,980, अब्बास मणियार यांच्या घराचे दहा हजार रुपये, शांताराम गावेळ यांच्या घराचे 12 हजार, सरस्वती बैकर यांच्या घराचे चार हजार , रत्नागिरी-नाखरे येथे प्रकाश मोगरकर यांच्या घराचे 11,500 , राजापूर-हर्डी येथे एकनाथ चोरगे यांच्या घराचे 1,880 रुपयांचे नुकसान झाले. संगमेश्‍वर कोडगाव-जोशीवाडीत ग्रामपंचायतीने बांधलेली संरक्षक भिंत कोसळली.

Web Title: Heavy rains damage houses