Photo : परतीच्या पावसाने लांज्यात ढगफुटी

रवी साळवी
Sunday, 11 October 2020

शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

लांजा (रत्नागिरी) :  लांजा शहर आणि परिसरात ढगफुटी सदृश्य अति मुसळधार पाऊस पडला. अति मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेले भात पीक वाहून गेले आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

आज अचानक पाच वाजल्यानंतर लांजा शहरातील द्वारका सोसायटी ते कुवे या परिसरात ढगफुटी झाली. द्वारका सोसायटीत पाणी घुसून सोसायटीतील सर्व गाड्या या पाण्यात  बुडाल्या. तर कूवेगावातील अनेक शेतकऱ्यांची भात पिके पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले आहे तर वेरळ ,दे वधे आदींसह अन्य गावांमध्ये सुद्धा पावसामुळे भात पीक वाहून गेले आहे. अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा- Photo : कोकणात मुसळधार ; मळ्यातच भात कुजण्याची भिती -

 मंगळवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  लांजा तालुक्यात ढग फुटी पाऊस झाला.  ओझर येथे पुराचे पाणी अपार्टमेंट मध्ये घुसले आहे.  खावडकर वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आले असून वाहतूक बंद आहे.  एसटी आगारालाही पाण्याचा विळखा होता.  लांजाबरोबर राजापूर तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे.  ढगांच्या गडगडाटासह पडणाऱ्या पावसाने ठीक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीत खंड पडला आहे. परतीच्या पावसामुळे  भात मळ्यातचं आडवी झाली आहेत. त्यामुळे नुकसानीची शक्यता आहे. सुरुवातीपासून यंदा भाताला चांगले वातावरण होते.  त्यामुळे पिक भरघोस येईल असा अंदाज होता. मात्र सप्टेंबरला पडलेल्या पावसामुळे गडबड झाली असून मोठे नुकसान झाले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains lashed the city of Lanza and its environs ratnagiri