सिंधुदुर्गातील फोंडाघाट, खारेपाटणमध्ये पावसाचा कहर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

फोंडाघाट/ खारेपाटण - परतीच्या पावसाने आज फोंडाघाट आणि खारेपाटण परिसरात हाहाकार उडविला. अवघ्या अर्ध्या - पाऊणतासात ढगफुटीसदृश्‍य पाऊस कोसळल्याने नदी-नाल्यांना पूरसदृश्‍य पाणी आले होते. भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

फोंडाघाट/ खारेपाटण - परतीच्या पावसाने आज फोंडाघाट आणि खारेपाटण परिसरात हाहाकार उडविला. अवघ्या अर्ध्या - पाऊणतासात ढगफुटीसदृश्‍य पाऊस कोसळल्याने नदी-नाल्यांना पूरसदृश्‍य पाणी आले होते. भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

जूनपासून सातत्याने कोसळत असलेल्या पावसाने अजूनही पाठ सोडलेली नाही. काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने परतीचा मार्ग स्विकारला असे वाटत असताना पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. आज सायंकाळी फोंडाघाट परिसरात कोसळलेला पाऊस ढगफुटीसदृश्‍य होता. त्यामुळे अनेकांची पाचवर धारण बसली. कणकवली तालुक्‍यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही भागात रिमझीम पाऊस झाला. मात्र फोंडाघाट आणि बाजारपेठ परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास ढगफुटीसदृश्‍य पाऊस कोसळला.

पावसामुळे परिसरातील शेती पाण्याखाली गेली. भातशेती सध्या कापणीस तयार आहे; मात्र गेले आठ दिवस पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. त्यामुळे भातकापणी करणे शेतकऱ्यांना शक्‍य होत नाही. दिवसभर ढगाळ वातावरण सायंकाळी पावसाची हजेरी असा कोप सुरू आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सुरू झाल्याने पुढील काही दिवस पाऊस माघारी जाण्याची शक्‍यता कमी असल्याचे वेदशाळेने म्हटले आहे. 

खारेपाटण - येथील परिसरात गेले तीन दिवस सातत्याने पाऊस हजेरी लावत आहे. आज दुपारी ढगफुटीसदृश्‍य पाऊस कोसळल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. दुपारी दोनच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी हळवी भातशेती कापून ठेवली होती त्या शेतीचेही नुकसान झाले. पावसामुळे तयार झालेले भातपीक सडून जात असल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होवू लागली आहे. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्यांनी दुर्लक्ष केला आहे. खारेपाटण, चिंचवली, तिथवली, दिगशी, शेर्पे, कुरंगवणे, नडगिवे, वायंगणी या गावात आज जोरदार पाऊस झाला. 

अधिक वाचा

दिवाळीत यंदा गृहसजावटीचा नवा ट्रेंड 
शेतीत साकारले छत्रपती संभाजीराजे यांचे चित्र 
Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 144 कलम लागू 
महान भारत केसरी दादू चाैगले यांचे निधन 
सिधुदुर्गातील फोडा येथे ढगफुटी... 
वाळवा तालुक्यात चोविस तासात सर्वाधिक 32.5 मि. मी. पाऊस 
बांबूच्या आकाशकंदिलांचे विविध प्रकार कोल्हापूर बाजारात - 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains in Phonda Kharepatan in Sindhudurg Distirct