मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुल्ल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

संगमेश्‍वर - नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांची पावले गोव्यासह कोकणकडे वळल्याने सध्या वाहनांच्या गर्दीने मुंबई- गोवा महामार्ग हाऊसफुल्ल झाला आहे. 

संगमेश्‍वर - नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातील पर्यटकांची पावले गोव्यासह कोकणकडे वळल्याने सध्या वाहनांच्या गर्दीने मुंबई- गोवा महामार्ग हाऊसफुल्ल झाला आहे. 

संगमेश्‍वर तालुक्‍यातून जाणारा महामार्ग अपघातप्रवण क्षेत्र म्हणून परिचित आहे. सध्या हा पट्टा खड्डयांनी व्यापल्याने वाहनांचा वेग कमी आहे. नाताळसाठी राज्यभरातील पर्यटकांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला होता. गोव्याबरोबरच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्येही पर्यटकांची गर्दी आहे. पर्यटकांनी कोकण रेल्वेच्याबरोबरीनेच स्वतःच्या वाहनाने प्रवास करणे पसंत केल्याने महामार्गावर आठवडाभर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे.

त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. संगमेश्‍वरातील शास्त्री आणि सोनवी या दोन ब्रिटिशकालीन अरुंद पुलावर ही कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अजूनही 31 डिसेंबरला चार दिवसांचा अवधी आहे. परिणामी पुढील दोन दिवसात महामार्गावरची वाहतूक वाढणार आहे. 

Web Title: Heavy Traffic on Mumbai- Goa highway