दीपक केसरकरांकडून ४८ लाख

Help of MLA Deepak Kesarkar
Help of MLA Deepak Kesarkar

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  "कोरोना'च्या संकटावर मात करण्यासाठी आमदार निधीतून 48 लाखांची मदत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी दिल्याची माहिती माजी, राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांची तिथेच व्यवस्था करण्याचे निर्देश दिले असून गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा अन्यत्र जाणाऱ्या युवक-युवतींसाठी मध्यस्त अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी श्री. पनवेलकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ""कोरोना विरोधात लढण्यासाठी आमदार निधीतील 48 लाखांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली आहे. आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा उत्तम काम करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी सतर्क आहेत. जनतेनेही "कोरोना'चे गांभीर्य लक्षात घेऊन काळजी घ्यावी. जीवनावश्‍यक वस्तू घेताना गर्दी करू नये. तसेच प्रशासनालाही सहकार्य करावे. आंबा व्यावसायिकांवर ओढवलेले संकट मोठे आहे. या संदर्भातही सचिवांशी चर्चा झाली असून आंबा व्यावसायिकांनी एक दर ठरवून द्यावा.'' 

ते म्हणाले, ""गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांसंदर्भातही मुंबईत असताना सचिव श्रीमती कुंदन यांच्याशी चर्चा झाली. मुलांच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून गोव्याचे उपजिल्हाधिकारी श्री. पनवेलकर यांची नेमणूक केली आहे. गोव्यात अडकलेल्या मुलांनी घाबरू नये. गोव्यातून 34 तरुण-तरुणी सीमेवर अडकली होते. त्यांना आपल्या जिल्ह्यात आणले असले तरी त्यांना 14 दिवस क्‍वारंटाईन केले आहे. सावंतवाडीतील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबत लवकरच डॉक्‍टरांशी चर्चा करणार आहे.

खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत व उपचार सुरू करावेत. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना इमर्जन्सी औषधे तसेच इतर आजारावरील औषधांची मागणी त्यांनी ग्रामपंचायतीकडे नोंदवावी व ग्रामपंचायतीने याबाबत कळविल्यानंतर जीवनोपयोगी औषधे त्यांना पुरविण्यात येणार आहेत.'' नागरिकांना मास्क, इमर्जन्सी औषधे तसेच डॉक्‍टर्सना सेफ्टी रिक्रुटमेंटसाठी आमदार निधीचा वापर केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

उपरकरांची टीका हास्यास्पद 
केसरकर म्हणाले, ""मुंबईमध्ये 14 मार्चला छोटासा अपघात झाल्याने सावंतवाडीत येऊ शकलो नाही. तरीही "कोरोना' विरोधात लढण्यासाठी मुंबईत राहूनही रात्री-अपरात्री काम करत होतो. कोणाच्या संपर्कात न येता काम सुरू होते. त्यामुळे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलेली टीका हास्यास्पद आहे. उपरकर हे दोन वर्षे आजारी होते त्यावेळी कुणीही टीका केली नव्हती. उलट ते लवकर बरे व्हावेत, असेच सर्वांना वाटत होते. त्यामुळे वस्तुस्थिती जाणून टीका करावी.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com