जागतिक स्थितीनुसार युद्धाचे निर्णय होतात : हेमंत भागवत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

चिपळूण - सैनिक युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढणार असला, डावपेच ठरविणार असला तरी त्याबाबतचे निर्णय सरकारमधील मंत्र्यांनी घ्यावयाचे असतात. असे निर्णय युद्धभूमी लक्षात घेऊन आणि तत्कालीन जागतिक परिस्थिती व दबाव लक्षात घेऊन घ्यावे लागतात. इंदिराजी आणि अटलजी यांनी असे निर्णय घेऊन भारताची शान जगात उंचावली, असे मत चिपळूणचे सुपुत्र एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांनी येथे व्यक्त केले. 

‘सकाळ’च्या चिपळूण विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा सत्कार आणि मुलाखतीचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. येथील लोकमान्य टिळक वाचन मंदिराच्या उषाताई साठे सभागृहात हा कार्यक्रम तसेच स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.

भागवत म्हणाले, ‘‘बांगलादेश स्वतंत्र करण्याच्या काळात भारतावर अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांचा दबाव होता. अमेरिकेचे सातवे आरमार आपल्या शेजारील समुद्रात दाखलही झाले होते. मात्र, इंदिराजी डगमगल्या नाहीत. त्या आधी युद्धाचा काळ एप्रिल-मे नको, पावसानंतर युद्ध करू आणि जिंकून देऊ, अशी ग्वाही माणेकशॉ यांनी दिली आणि इंदिराजींनी तो सल्ला मानला. पुढचा इतिहास साऱ्यांनाच ठाऊक आहे. कारगिल युद्धावेळी अटलजींनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून घुसायचे नाही, अशी सक्त ताकीद दिली होती. सैन्याचा विचार थोडा वेगळा होता. मात्र, जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा पारदर्शक असल्याचे सिद्ध झाले. कारगिल युद्ध भारताने जिंकले.’’

Web Title: Hemant Bhagvat comment