रत्नागिरीतील हातखंबा,भोस्तेमध्ये गांजा जप्त

hemp Confiscated in ratnagiri
hemp Confiscated in ratnagiri

रत्नागिरी/खेड - स्थानिक गुन्हे शाखेने आज जिल्ह्यात अंमली पदार्थविरुधी मोहीम राबवली. हातखंबा तिठा, खेड येथे कारवाई करून 57 हजारांचा सुमारे 3 किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी तीन संशयिताना अटक केली असून खासगी बससह एकूण 14 लाख 46 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मासुम मुनावर कालवे (वय 23, रा. भोस्ते, जसनाईक मोहल्ला, खेड), महादेव लक्ष्मण धवळगी (वय 35, रा. भटवाडी, ता. लांजा), प्रतीक हरिश्‍चंद्र मयेकर (वय 24, रा. राजापूर) अशी संशयितांची नावे आहेत. सावर्डे येथे झालेल्या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अंमली पदार्थविरोधी कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेने माहिती काढण्यास सुरवात केली. गुरुवारी (ता. 17) भोस्ते (ता. खेड) गावातील जलाल शहा मोहल्ला येथे एक व्यक्ती गांजा विक्री करतो अशी गोपनीय माहिती मिळाली. अधीक्षक गर्ग आणि अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने कारवाई केली. 
या कारवाईत जलालशहा मोहल्ला येथील रेल्वे बोगद्याकडे जाणाऱ्या रोडवर संशयित मासुम कालवे यांच्याकडून विक्रीसाठी असलेला 16 हजार किंमतीचा 803 ग्रॅम गांजा जप्त केला. यात संशयिताला अटक केली. पोलिस हवालदार राकेश बागुल यांच्या तक्रारीवरून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संशयित कालवे याला न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडी सुनावली. 

आज पोलिसांना मुंबई येथून निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्समधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर हातखंबा तिठा येथे पोलिस सापळा लावला. मुंबईहून राजापूरकडे जाणारी लक्‍झरी बस (एमएच-01-एसी-4278) अडवून तपासणी केली. गाडीचे चालक संशयित महादेव धवळगी, प्रतीक मयेकर यांच्या ताब्यातील ड्रायव्हर केबिनमध्ये एका सॅकमध्ये 41 हजाराचा 2 किलो 139 ग्रॅम गांजा मिळून आला. या कारवाईमध्ये गांजा आणि खासगी बस असा 14 लाख 46 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही संशयितांना अटक केली असून उपनिरीक्षक विकास चव्हाण यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील अधिक तपास करत आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com