सिंधुदुर्गात गेल्या चोविस तासात 'इथे' झाला सर्वाधिक पाऊस

Highest Rain In Malvan Sindhudurg Marathi News
Highest Rain In Malvan Sindhudurg Marathi News

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्‍यात सर्वाधिक 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी वैभववाडी तालुक्‍यात 24 मिलीमीटर पाऊस झाला. 

जिल्ह्यात सरासरी 71 पूर्णांक 875 मिलीमीटर पाऊस झाला असून तालुकानिहाय पावसाची आकडेवारी व कंसात आतापर्यंतचा पाऊस मिलीमीटरमध्ये असा - दोडामार्ग 84 (169), सावंतवाडी 84 (138), वेंगुर्ला 103 (133.6), कुडाळ 67 (100), मालवण 110 (147), कणकवली 25 (55), देवगड 78 (94), वैभववाडी 24 (95), असा पाऊस झाला आहे. 

दरम्यान तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 86.200 मिलीमीटर पाऊस झाला. तर देवघर प्रकल्प क्षेत्रात 26.50 मिलीमीटर आणि कोर्ले-सातंडी क्षेत्रात 29.00 मिलीमीटर आणि अरुणा प्रकल्प क्षेत्रात 50.20 पाऊस झाला. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे दशलक्षघनमीटर परिमाणात आहेत.

तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 215.8900 दशलक्षघनमीटर पाणीसाठा आहे. सध्या तिलारी प्रकल्प 48.26 टक्के भरलेला आहे. मध्यम पाटबंधारे प्रकल्प-देवघर-26.1740, अरुणा-18.7100, कोर्ले-सातंडी-22.3200. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा असा ः शिवडाव-0.9990, नाधवडे-1.8179, ओटाव-1.6476, देंदोनवाडी- 0.2194, तरंदळे-0.7330, आडेली-0.0160, आंबोली-0.2980, चोरगेवाडी-0.6050, हातेरी-0.2300, माडखोल-1.0070, निळेली-0.3020, ओरोस बुद्रुक-0.4660, सनमटेंब-0.4380, तळेवाडी-डिगस-0.1910, दाभाचीवाडी-0.5250, पावशी-0.7240, शिरवल- 0.4400, पुळास-0.1080, वाफोली-0.0180, कारीवडे-0.1160, धामापूर-0.4710, हरकूळ-0.4260, ओसरगाव-0.0160, ओझरम-0.4240, पोईप-0.0, शिरगाव-0.0250, तिथवली-0.3850, लोरे-0.0560. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com