महामार्गावरील दरोड्यातील आरोपींना सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

लोणेरे (जि. रायगड) - मुंबई-गोवा महामार्गावर रातवड गावाजवळ ऑगस्ट 2015 मध्ये रात्रीच्या वेळेस रस्त्यावर गोणी ठेवून कार अडवून कारमधील दाम्पत्याला लुटण्यात आले होते. या प्रकरणाचा माणगाव जलदगती न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागला आहे. यातील पाचही आरोपींना अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश टी. एम. जहागिरदार यांनी सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.

तक्रारदार मानिनाल दोशीआणि त्यांची पत्नी गोरेगाव येथून मोटारीने मुंबईकडे जात होते. महामार्गावरील मौजे रातवड गावाच्या हद्दीत ते आले असता, आरोपींनी त्यांची गाडी अडवली. दोशी पती-पत्नीला मारहाण करून त्यांच्याकडील एक लाखाचा मुद्देमाल घेऊन पळ काढला होता.

Web Title: highway robbery crime accused punishment