व्यवसायीकांना महामार्ग विभागाच्या नोटीसा

सुनील पाटकर
रविवार, 15 जुलै 2018

महाड : महामार्ग विभागाची कोणतीही पूर्वं परवानगी न घेता मुंबई गोवा महामार्गावरून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जोडरस्ता तयार करणाऱ्यांना महामार्ग विभागाने दणका दिला आहे. महाड मधील गॅरेज, हॉटेल व्यवसायीक, मोटार भाग विक्रेते आदींचा व्यवसायिकांना याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यानुसार अनेकांवर दंडात्मक कारवाई होउ शकते.

महाड : महामार्ग विभागाची कोणतीही पूर्वं परवानगी न घेता मुंबई गोवा महामार्गावरून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जोडरस्ता तयार करणाऱ्यांना महामार्ग विभागाने दणका दिला आहे. महाड मधील गॅरेज, हॉटेल व्यवसायीक, मोटार भाग विक्रेते आदींचा व्यवसायिकांना याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यानुसार अनेकांवर दंडात्मक कारवाई होउ शकते.

मुंबई गोवा महामार्गावर विविध ठिकाणी महामार्गालगत अनेकांनी व्यवसायीक इमारती, निवासी संकुल, व्यवसायीक गाळे उभे केले आहेत. हे काम करत असताना कोणीही महामार्ग बांधकाम विभागाची परवानगी घेतलेली नाही. नियमानुसार महामार्गालगत कोणतेही बांधकाम करत असताना नियोजीत अंतर सोडून बांधकाम करावयाचे आहे. मुंबई गोवा महामार्गावर महाड नजीक विविध बांधकामे ही व्यवसायीक कारणास्तव झाली आहेत. या बांधकामांना महामार्गावरून जोडरस्ता असणे आवश्यक आहे. 

याकरीता महामार्ग बांधकाम विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. ही परवाणगी अनेकांनी न घेतल्याने महामार्ग विभागाने नोटीसा बजावल्या आहेत. आतापर्यंत महामार्ग विभागाने महाड नजीक असलेल्या 30 व्यवसायीकांना नोटीसा बजावल्या आहेत. उर्वरीत व्यवसायीकांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू आहे.  महामार्गावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ते बुटाला सभागृह पर्यंत महामार्गालगत फुटपाथ तयार करण्यात आले होते. मात्र यावर देखील बेमालुमपणे व्यवसाय उभे राहीले आहेत. महामार्ग विभागाने दुर्लक्ष केल्याने हा फुटपाथतोडून व्यवसायीकांनी मार्ग तयार केले आहेत. काही ठिकाणी प्रवासी वाहतूक करणारी वाहणने देखील उभी राहतात.

महामार्गावरून आपल्या व्यवसायीक जागेत जाण्याकरीता महामार्ग विभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र अनेकांनी पूर्व परवानग्या घेतलेल्या नाहीत. आतापर्यंत 30 जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. यापुढे व्यवसाय करणाऱ्यांनी जोडरस्त्यारीता परवानगी घ्यावी.
 - प्रकाश गायकवाड, उपअभियंता महामार्ग बांधकाम विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highways Department Notices for Businessmen