अपघात करून पळालेल्या वाहन चालकास कराडमध्ये अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

चिपळूण - शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय सुर्वे यांच्या दुचाकीला धडक देवून पळालेल्या वाहन चालकाला कराड येथून ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे त्याला अटकही करण्यात आली.

चिपळूण - शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय सुर्वे यांच्या दुचाकीला धडक देवून पळालेल्या वाहन चालकाला कराड येथून ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे त्याला अटकही करण्यात आली. घटना घडल्यानंतर केवळ चार दिवसात अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निशा जाधव यांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला. 

शिरगाव-बौद्धवाडी येथील पुलावर सुर्वे यांच्या दुचाकीला 11 ऑक्‍टोबरला सायंकाळी साडेसात वाजता अपघात झाला होता. अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत सुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक निशा जाधव यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि चेकपोस्ट नाक्‍यावरील वाहनांच्या नोंदी तपासल्या. त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे वाहन संशयास्पद आढळले.

सौ. जाधव यांनी गाडी क्रमाकांच्या आधारे आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून मालकाचा पत्ता शोधून काढला. ती गाडी कराड येथील भाजी व्यावसायिकाची असल्याचे समजल्यानंतर पोलिसांचे एक पथक कराडला गेले. दीपक चव्हाण याला कराडमधून वाहनासह ताब्यात घेवून शिरगावला आणण्यात आले. चौकशी दरम्यान सुरवातीला त्याने आपण अपघात केला नसल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक सौ. जाधव यांनी चव्हाण याची उलट तपासणी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक केली. 

Web Title: Hit and Run case driver arrested in Karad

टॅग्स