एचओसी प्रकल्पग्रस्तांची मंगळवारी मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक 

लक्ष्मण डुबे 
सोमवार, 9 एप्रिल 2018

शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे  प्रकल्पग्रस्तांनी रविवार (ता 08) रोजी रसायनीतुन पायी लाँग मार्च काढुन  सोमवार (ता 09) रोजी सीबीडी बेलापुर येथील विभागीय आयुक्त कोकण भवन कार्यालयावर  सर्वपक्षीय मोर्चा नेण्याचा इशारा संस्थेने दिला होता. 

रसायनी (रायगड) : प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था रसायनी यांनी एचओसी कंपनीच्या प्रवेश व्दारा  समोर प्रलंबीत मागण्यांन करिता शुक्रवार ( ता 23 ) मार्च पासुन धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे  प्रकल्पग्रस्तांनी रविवार (ता 08) रोजी रसायनीतुन पायी लाँग मार्च काढुन  सोमवार (ता 09) रोजी सीबीडी बेलापुर येथील विभागीय आयुक्त कोकण भवन कार्यालयावर  सर्वपक्षीय मोर्चा नेण्याचा इशारा संस्थेने दिला होता. 

दरम्यान एचओसी प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या बाबत मुख्यमंत्री यांनी मंगळवार ( ता 10 ) रोजी मंत्रालयात  बैठक बोलविली आहे. त्यामुळे सीबीडी विभागीय आयुक्त कोकण भवन कार्यालयावर नेण्यात येणारा धडक मोर्चा  तात्पुर्ता  स्थगित करण्यात आला आहे. आशी माहिती संस्थेचे सहसचिव समीर खाने यांनी दिली आहे. 

एचओसी कंपनीने न वापरलेली जमीन परत मिळावी, कंपनीला सरकाराने जमीन विक्रीस दिलेली परवानगी रद्द करावी, गरजे पोटी कंपनीच्या जागेत बांधलेली घर कायम करावी आदि प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या आहे. बैठकीत समाधान कारक निर्णय झाला नाही. तर मंत्रालयावर रसायनीहुन लाँग मार्च काढुन मोर्चा  नेण्यात येईल असे प्रकल्पग्रस्ताच्या संस्थने पत्रकातुन कळविले आहे.

Web Title: HOC project agitation in Rasayani