esakal | ...म्हणून 10 गावात होळीच नाही...

बोलून बातमी शोधा

holi festival events in sindudurg kokan marathi news

होळी उत्सव 9 पासून सुरू होत असून सिंधुदुर्गातील 10 गावांत मानपानावरून वाद आहेत.

...म्हणून 10 गावात होळीच नाही...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : होळी उत्सव 9 पासून सुरू होत असून सिंधुदुर्गातील 10 गावांत मानपानावरून वाद आहेत. त्यामुळे तेथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून या गावात होळी उत्सवास निर्बंध घालण्यात आले आहेत.

तहसीलदार स्तरावर हे वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू असून यातील काही गावांमधील वाद मिटण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात सार्वजनिक 585 तर खासगी 700 अशा एकुण 1285 ठिकाणी होळीचे पूजन केले जाणार आहे, अशी माहीती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.

हेही वाचा- नाट्यरसिकांचा अंत पाहू नका : सुबोध भावे

जिल्ह्यात 10 गावात होळीवर निर्बंध

गणेशोत्सवानंतर कोकणात दणक्‍यात साजरा होतो तो शिमगोत्सव. चाकरमानी शिमग्यासाठी मोठ्या संख्येने कोकणात येऊन ग्रामदैवतेच्या होळीसमोर नतमस्तक होतात. हातभेटीचा नारळ, नवस फेडले जातात. जिल्ह्यात होळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रत्येक गावात, वाडी-वाड्यांवर होळी उभारण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी 585 तर खासगी 700 ठिकाणी होळी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

हेही वाचा-  कोरोनामुळे फ्रोजन निर्यातीला बसणार मोठा फटका...

मानपानावरून वाद​

जिल्ह्यातील 10 गावांत मानपानावरून वाद आहेत. त्यामुळे तेथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून या गावात होळी उत्सवास तुर्तास निर्बंध घालण्यात आले आहेत. तहसीलदार स्तरावर हे वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू असून यातील काही गावांमधील वाद मिटण्याची शक्‍यता आहे. यात दोडामार्ग पोलिस ठाणे अंतर्गत 1 गाव, सावंतवाडी 2, वेंगुर्ला 1, कुडाळ 2, कणकवली 2, देवगड 1 आणि वैभववाडी पोलिस ठाणे अंतर्गत 1 गावचा समावेश आहे.

 हेही वाचा-  मत्स्यव्यवसायांसाठी खुशखबर बजेटमध्ये मोठी घोषणा....

जिल्ह्यात 1285 ठिकाणी साजरा होणार होलीकोत्सव !

*पोलीस ठाणे*सार्वजनिक होळी*खासगी होळी
*दोडामार्ग*56*62
*बांदा*26*42
*सावंतवाडी*40*103
*वेंगुर्ले*27*40
*निवती*12*20
*कुडाळ*91*126
*सिंधुदुर्गनगरी*9*26
*मालवण*59*25
*आचरा*67*56
*कणकवली*68*63
*देवगड*67*55
*विजयदुर्ग*25*27
*वैभववाडी*38*55
*एकूण*585*700